Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बाहेरचे शूज घरात घालून येण्याची सवय म्हणजे विचित्र आजारांना आमंत्रण, संशोधन सांगते-दाराबाहेर बूट बरे कारण..

बाहेरचे शूज घरात घालून येण्याची सवय म्हणजे विचित्र आजारांना आमंत्रण, संशोधन सांगते-दाराबाहेर बूट बरे कारण..

Shoe in House Side Effects : संशोधनानुसार, बाहेर घातलेले शूज घरात अनेक घातक जंतू आणि घाण घेऊन येतात, जे थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:12 IST2026-01-24T10:37:59+5:302026-01-24T15:12:32+5:30

Shoe in House Side Effects : संशोधनानुसार, बाहेर घातलेले शूज घरात अनेक घातक जंतू आणि घाण घेऊन येतात, जे थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात.

Study reveals wearing shoes indoors may cause illness | बाहेरचे शूज घरात घालून येण्याची सवय म्हणजे विचित्र आजारांना आमंत्रण, संशोधन सांगते-दाराबाहेर बूट बरे कारण..

बाहेरचे शूज घरात घालून येण्याची सवय म्हणजे विचित्र आजारांना आमंत्रण, संशोधन सांगते-दाराबाहेर बूट बरे कारण..

Shoe in House Side Effects : आपण अनेकदा बाहेरून आल्यावर शूज घराबाहेर न काढताच घरात फिरतो आणि ही सवय अगदी सामान्य मानली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का की हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते? संशोधनानुसार, बाहेर घातलेले शूज घरात अनेक घातक जंतू आणि घाण घेऊन येतात, जे थेट तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे आता घरात शूज घालून येण्याची सवय लगेच बदलण्याची वेळ आली आहे.

संशोधन काय सांगतं?

अमेरिकेतील University of Arizonaच्या एका अभ्यासात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या रिसर्चनुसार 96% पेक्षा जास्त शूजमध्ये बॅक्टेरिया आढळले. हे बॅक्टेरिया अनेकदा लादीवर किंवा हातांवर आढळणाऱ्या जंतूंपेक्षाही जास्त धोकादायक असतात. शूजवर E. coli सारखे घातक जंतूही सापडले, जे पोटाच्या तक्रारी आणि यूरिन इन्फेक्शनसारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात.

शूजमुळे घरात घाण कशी पसरते?

आपण बाहेर फिरताना शूज रस्ते, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रेस्टॉरंट्स, घाणेरडी ठिकाणे यांच्या संपर्कात येतात. या ठिकाणांवरून शूजच्या माध्यमातून घरात येतात.

मुलांवर आणि कुटुंबावर होणारा परिणाम

लहान मुले जमिनीवर खेळतात आणि वारंवार हात तोंडात घालतात. अशा वेळी शूजमुळे आलेली घाण थेट त्यांच्या शरीरात जाऊ शकते. यामुळे अ‍ॅलर्जी, पोटाचे आजार, संसर्ग, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

काय करायला हवे?

घराच्या दारातच शूज काढण्याची सवय लावा

घरात वापरण्यासाठी वेगळ्या चपला किंवा स्लीपर्स ठेवा

पाहुण्यांनाही शूज बाहेर काढण्यास सांगा

जर घरात कुणी शूज घालून फिरत असेल, तर लादीची नियमित स्वच्छता नक्की करा

घर स्वच्छ आणि सुरक्षित ठेवणं मोठ्या गोष्टींवर नाही, तर छोट्या सवयींवर अवलंबून असतं. घरात बाहेरचे शूज घालणं जरी सामान्य वाटत असलं, तरी ते अनेक आजारांचे कारण ठरू शकतं. म्हणूनच दारातच शूज काढण्याची सवय लावा. हा छोटासा बदल तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याचं दीर्घकाळ संरक्षण करू शकतो.

Web Title : बाहर के जूते घर में पहनना स्वास्थ्य के लिए हानिकारक: शोध का खुलासा

Web Summary : बाहर के जूते घर में पहनना स्वास्थ्य के लिए जोखिम भरा है। अनुसंधान से पता चलता है कि जूते हानिकारक बैक्टीरिया ले जाते हैं, जिससे संक्रमण और एलर्जी होती है, खासकर बच्चों में। दरवाजे पर जूते उतारें, घर के अंदर अलग जूते पहनें और बेहतर स्वच्छता के लिए नियमित रूप से फर्श साफ करें।

Web Title : Wearing outside shoes indoors: Harmful to health, research reveals.

Web Summary : Wearing outside shoes indoors is a health risk. Research shows shoes carry harmful bacteria, causing infections and allergies, especially in children. Remove shoes at the door, use separate indoor footwear, and regularly clean floors for better hygiene.