Join us

कॉफी पिण्याची 'ही' वेळ मेंदूसाठी फार घातक, संशोधनाचा दावा-कॉफी पिणाऱ्यांसाठी खास इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 19:05 IST

Coffee Side Effect On Brain : कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी कॉफी पिण्याची वेळ जर चुकीची असेल तर मेंदुसाठी चांगलं ठरत नाही. याबाबतचा एक रिसर्च समोर आला आहे.

Coffee Side Effect On Brain : आरोग्याला होणारे वेगवेगळे फायदे पाहून चहा पिणारे बरेच लोक आता कॉफीकडे वळले आहेत. ते चहाऐवजी रोज कॉफी पितात. भरपूर लोक ब्लॅक कॉफी पितात. ब्लॅक कॉफीचे आरोग्याला अनेक फायदे असल्याचं एक्सपर्ट सांगतात. असं मानलं जातं की, कॉफी प्यायल्यानं शरीराला एनर्जी मिळते. बीपी लो असलेल्यांसाठीही कॉफी चांगली मानली जाते. इतकंच नाही तर फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी देखील ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला दिला जातो. कॉफी पिण्याचे अनेक फायदे असले तरी कॉफी पिण्याची वेळ जर चुकीची असेल तर मेंदूसाठी चांगलं ठरत नाही. याबाबतचा एक रिसर्च समोर आला आहे.

कधी पिऊ नये कॉफी?

कॉफी प्यायल्यानं शरीराला भलेही एनर्जी मिळत असेल, पण दुपारच्या जेवणानंतर कॉफी पिणं मेंदूसाठी घातक ठरू शकतं. एका रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की, लंचनंतर कॉफी प्यायल्यास रात्री उशीरापर्यंत मेंदू अ‍ॅक्टिव राहू शकतो. रिसर्चनुसार, कॉफीमधील कॅफीननं रात्रीच्या झोपेत अडथळा निर्माण होऊ शकतो.

कॉफी प्यायल्यानं मेंदुला काय होतं?

कॅनडातील मॉन्ट्रियल यूनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार, कॉफीमुळे नर्व्हस सिस्टीमवर वाईट प्रभाव पडतो. या रिसर्चमध्ये ४० लोकांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. ४० लोकांना एक दिवस २०० मिलीग्रॅम कॅफीन देण्यात आलं, तेच दुसऱ्या रात्री त्यांना कोणतंही कॅफीन देण्यात आलं नाही. तेव्हा त्यांच्या झोपेची गुणवत्ता चेक करण्यात आली. तेव्हा असं आढळून आलं की, ज्या दिवशी त्यांना कॅफीनचं सेवन केलं होतं, त्या रात्री त्यांच्या मेंदूच्या 'नॉन आरईएम' वर फार जास्त प्रभाव पडतो. नॉन आरईएमनं झोपदरम्यान शरीराला शांत आणि आरामदायक बनवण्यास मदत मिळते. यादरम्यान श्वास, मेंदू आणि हार्टची हालचाल स्लो होते. तसेच शरीर पेशी आणि स्नायूंना रिपेअर करतं, ज्यामुळे इम्यून सिस्टीम मजबूत राहते. तेच दिवसा कॉफी पिणाऱ्यांना रात्री गाढ झोप लागत नाही, ज्यामुळे या सगळ्या प्रक्रियांवर वाईट प्रभाव पडतो.

लठ्ठपणा, डायबिटीसचा धोका

कॅफीनचं जास्त सेवन केल्यास झोप येते, पण उशीरा येते. कॅफीनमुळे झोप पूर्णपणे येत नाही. गाढ झोप न आल्यानं मेंदूच्या क्रियांवर प्रभाव पडतो. तसेच झोप चांगली झाली नाही तर लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयासंबंधी आजारांचा धोका, तसेच इनफर्टिलिटीचा धोकाही वाढतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स