Join us
Daily Top 2 Weekly Top 5

कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस पिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा, वाढतोय ‘या’ आजाराचा धोका-उपचारही कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 20:42 IST

Type 2 Diabetes : अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, या दोन्ही गोष्टी तुमच्या ब्लड शुगरचं नुकसान करू शकतात.

Type 2 Diabetes : उकाडा वाढला की, बरेच लोक कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस प्यायला लागतात. कारण या गोष्टींनी शरीराला थंडावा मिळतो आणि फ्रेश वाटतं. त्यामुळे आजकाल यांची मागणी खूप वाढली आहे. बाजारात वेगवेगळे कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस मिळतात. पण हेल्थ एक्सपर्ट नेहमीच कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस न पिण्याचा सल्ला देतात.

अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, या दोन्ही गोष्टी तुमच्या ब्लड शुगरचं नुकसान करू शकतात. शोधात फळांचा ज्यूस आणि गोड पेय प्यायल्यानं टाइप 2 डायबिटीसचा धोका यात संबंध आढळून आला आहे. 

अ‍ॅडवांसेज इन न्यूट्रीशन नावाच्या मॅगझिनमध्ये प्रकाशित या रिसर्चमध्ये वेगवेगळ्या महाद्वीपावरील 5 लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आरोग्यासंबंधी आकडेवारीचं विश्लेषण करण्यात आलं. अमेरिकेतील ब्रिंघम यंग यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, हे ड्रिंक टाइप 2 डायबिटीसचा धोका खूप आधीपेक्षा अधिक वाढवतात. अभ्यासकांना आढळलं की, पोषक तत्व असलेले खाद्य पदार्थ जसे की, कडधान्य, डेअरी उत्पादनं यांच्या माध्यमातून ग्रहण केलेली शुगर शरीरात वेगळ्या प्रकारे रिअॅक्ट करते आणि लिव्हरवर चुकीचा प्रभाव टाकत नाही.

अभ्यासकांना सांगितलं की, असं असण्याचं कारण या खाद्य पदार्थांमध्ये फायबर, हेल्दी फॅट, प्रोटीन आणि इतर पोषक तत्वही असतात. जे ब्लड शुगर लेव्हल कमी ठेवण्यास मदत करतात. अभ्यासकांना आढळलं की, कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा स्पोर्ट्स ड्रिंकसारखा गोड पेय पदार्थांचं अधिक सेवन केलं तर टाइप 2 डायबिटीसचा धोका 25 टक्क्यांनी अधिक वाढतो. 

फळांचा रसही नुकसानकारक

रोज 100 टक्के फळांचा 250 मिलीलीटर ज्यूस प्यायल्यानं टाइप 2 डायबिटीसचा धोका 5 टक्क्यांनी वाढतो. पोषण विज्ञानाच्या प्रोफेसर आणि शोधाच्या मुख्य लेखिका कॅरेन डेला कोर्टे सांगतात की, 'हा वेगवेगळे शुगर सोर्स आणि टाइप 2 डायबिटीसचा धोका याबाबत संबंध सांगणारा शोध आहे. यातून समोर येतं की, साखर पिणं मग ते सोडाच्या माध्यमातून असो वा ज्यूसच्या आरोग्यासाठी नुकसानकारकच आहे'.

मुख्य समस्या या पेय पदार्थांमध्ये शुगर टाकण्याची पद्धत आहे. गोड ड्रिंक आणि फळांच्या ज्यूसमध्ये वेगवेगळी शुगर असते, जी ब्लड स्ट्रीममध्ये वेगानं पोहोचते आणि लिव्हरवर दबाव टाकते. यानं लिव्हरवर फॅट जमा होतं आणि इन्सुलिन रेजिस्टेंस वाढतो.

टॅग्स : मधुमेहआरोग्यहेल्थ टिप्स