Join us

धक्कादायक! आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या ८० टक्के लोकांना फॅटी लिव्हर डिजीज, रिसर्चमधून खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 10:07 IST

Fatty liver disease : एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या लोकांमध्ये मेटाबॉलिक डिस्फंक्शन संबंधित फॅटी लिव्हर डिजीजचा धोका अधिक वाढला आहे.

Fatty liver disease : भारतात आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या आज मोठी आहे. या लोकांना पगारही भरपूर मिळतो. मात्र, ९ ते १० तासांचं एकाच जागी बसून करावं लागणारं काम आणि स्ट्रेस यामुळे हे लोक वेगवेगळ्या गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, या लोकांमध्ये मेटाबॉलिक डिस्फंक्शन संबंधित फॅटी लिव्हर डिजीजचा धोका अधिक वाढला आहे.

काय आहे कारण?

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक तास एकाच जागी बसून काम करावं लागतं. सोबतच कामासंबंधी तणाव, कमी झोप, वेगवेगळ्या शिफ्ट, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि एक्सरसाईज न करणं या गोष्टींमुळे फॅटी लिव्हरची समस्या अधिक वाढते.

हा रिसर्च हैद्राबाद विश्वविद्यालयाचे वैज्ञानिक प्रोफेसर Kalyankar Mahadev आणि प्रोफेसर C T Anitha यांनी त्यांचे काही सहकारी आणि एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रोएंटेरोलॉजीचे सीनिअर हेपेटोलॉजिस्ट डॉ. पीएन राव व त्यांच्या टीमसोबत मिळून केला.

काय निघाला निष्कर्ष?

या रिसर्चमध्ये असं असं आढळून आलं की, ८४ टक्के आयटी कर्मचाऱ्यांना फॅटी लिव्हर (MAFLD), ७१ टक्के लोकांना लठ्ठपणा आणि ३४ टक्के लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोमची समस्या आहे. मेटाबॉलिक सिंड्रोम एक ग्रुप आहे जो फॅटी लिव्हर, लठ्ठपणा, डायबिटीस आणि हाय बीपीचा धोका वाढवतो.

काय आहे फॅटी लिव्हर डिजीज?

रिसर्चमध्ये सांगण्यात आलं की, चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मेटाबॉलिक फॅक्टर्समुळे लिव्हरमध्ये ५ टक्क्यांपेक्षा जास्त फॅट वाढतं तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हटलं जातं.

इतरही आजारांचा धोका

फॅटी लिव्हर एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. लिव्हर सिरोसिस आणि कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांटही करावं लागू शकतं. त्यामुळे हेल्दी लाइफस्टाईल, हेल्दी डाएट आणि नियमितपणे एक्सरसाईज करणं गरजेचं असतं.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स