Bloating Natural Remedy : जेवण केलं किंवा थोडं जरी चटरपटर खाल्लं तर अलिकडे अनेकांना ब्लोटिंग म्हणजेच पोट फुगण्याची समस्या होते. जर वेळेत त्यावर उपचार न केल्यास पोटात जडपणा, गॅस आणि अस्वस्थता जाणवू शकते. अशात बरेच लोक लगेच काही औषधं घेण्याकडे घाव घेतात. ज्याने फायदा मिळेलच असं नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही सोपे नॅचरल उपायही गुणकारी ठरतात. तेच पाहुयात.
पपई – पोट हलकं ठेवण्याचं गुपित
जर थोडं खाल्ल्यानंतरच तुमचं पोट फुगत असेल, तर काही दिवस पपई खाण्याची सवय लावा. पपईमध्ये असलेले पॅपेन एन्झाइम्स पचनक्रिया सुधारतात आणि आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवतात. पपई खाल्ल्यानंतर अर्ध्या तासात पोट हलकं वाटायला लागतं. तसेच पपई तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीही एक वरदान आहे.
काकडी आणि दही – गट हेल्थसाठी उत्तम
अनेक हेल्थ एक्सपर्ट नेहमीच सांगत असतात की, पोटाच्या आरोग्यासाठी काकडी खाणं खूप फायदेशीर आहे. काकडीमध्ये सुमारे 95% पाणी असतं, त्यामुळे शरीरातील गॅस बाहेर काढायला मदत मिळते. दही देखील गट हेल्थसाठी अत्यंत उपयोगी आहे. जेवणानंतर अर्धी वाटी दही खाल्ल्यास पोटातील सूज आणि ब्लोटिंग कमी होतं.
पुदिना आणि बडीशेप - नैसर्गिक उपाय
पोटात जडपणा किंवा गॅस जाणवत असल्यास पुदिन्याची काही पानं चावून खा. त्यातील तत्व पोटातील ताण आणि सूज कमी करतात. याशिवाय, बडीशेप हे सुद्धा एक प्रभावी घरगुती औषध आहे. चिमूटभर बडीशेप कोमट पाण्यात टाकून प्या काही मिनिटांतच आराम जाणवेल.
