Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटात एकाच बाजूला दुखते? कळ येते? फक्त अपचन नाही, असू शकतात 'हे' आजार

पोटात एकाच बाजूला दुखते? कळ येते? फक्त अपचन नाही, असू शकतात 'हे' आजार

Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases : पोटात एकाच बाजूला दुखत असेल तर त्यामागे असू शकतात हे त्रास. पाहा कोणती कारणे असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 18:22 IST2025-06-30T18:21:14+5:302025-06-30T18:22:58+5:30

Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases : पोटात एकाच बाजूला दुखत असेल तर त्यामागे असू शकतात हे त्रास. पाहा कोणती कारणे असतात.

Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases | पोटात एकाच बाजूला दुखते? कळ येते? फक्त अपचन नाही, असू शकतात 'हे' आजार

पोटात एकाच बाजूला दुखते? कळ येते? फक्त अपचन नाही, असू शकतात 'हे' आजार

पोटात दुखते आहे, पोटात गुडगुड होत आहे. पोटात जळजळत आहे. पोट जड वाटत आहे अशा सामान्य समस्या सगळ्यांच्याच आयुष्यात उद्भवतात. पोटात दुखण्यामागे विविध कारणे असतात सगळ्यात कॉमन कारण म्हणजे अपचन. (Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases)मात्र कधीतरी पोट एका बाजूला दुखते. पोटाच्या कोपर्‍यात सतत दुखत राहते. चालताना बोलताना ताणले जाते. तुम्हालाही असे दुखणे आहे का? मग ते फक्त अपचन नाही त्यामागे इतर कारणे असू शकतात. केअर हॉस्पिटल्सच्या साईटवर सागितल्यानुसार, पोट ज्या जागी दुखते त्यानुसार कारणाचा अंदाज लावता येतो. उजव्या बाजूला दुखते का डाव्या बाजूला दुखते हे पाहणे फार गरजेचे असते. 

 

उजव्या बाजूतील वरच्या भागात वेदना होत असेल तर मग गॅसची समस्या असू शकते. अपचनामुळे हा त्रास होतो. मात्र पित्ताशयाचाही त्रास असू शकतो. काहीही खाल्यानंतर पोटात कळ जाते. किंवा चालताना मध्येच कळ जाते.  वेळीच वैद्यकीय तपासणी करुन घ्या. 

उजव्या बाजूला दुखणे सुरु होऊन ते एका बाजूला सरकत जाते. तसेच वेदना तीव्र होत जातात. हा त्रास मूत्रपिंडातील खडे किंवा मूत्रमार्गातील संसर्गामुळेही होऊ शकतो. एवढेच नाही तर असा त्रास झाल्यावर लघवी करताना जळजळ होते. रक्तही पडू शकते. असा त्रास वाढत असेल तर वेळीच डॉक्टरांकडे जा. 

कावीळ होण्याआधीही पोट एका कोपऱ्यात दुखते. नंतर ते दुखणे शरीरभर पसरते. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तपासणी करा. थकवा येत असेल किंवा पिवळटपणा दिसत असेल तर मग वेळीच उपाय करायला घ्या.  
 
डाव्या बाजूला जर दिखत असेल तर मग  किडनी स्टोन, डायव्हर्टिक्युलायटिस, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम (IBS), युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा पॅल्विक आजारांमुळे वेदना होऊ शकतात. महिलांनी खास काळजी घ्यायला हवी. दुखण्याचे रुपांतर जर बदललेली लघवी, ताप, अतिसार किंवा बद्धकोष्ठतेत व्हायला लागले तर ही लक्षणे आजाराची आहेत. डॉक्टरांकडे जाऊन या. 

प्रत्येक वेळी मोठी समस्याच असते असे नाही. गॅसमुळेही वेदना होतात. जास्त ताण आल्यामुळेही असा त्रास होतो. मात्र त्याचे प्रमाण वाढत असेल तर दुर्लक्ष करु नका. पोटाच्या कोपऱ्यात होणाऱ्या वेदना या संकेतासारख्या असतात. तो वेळीच ओळखता आल्यावर आजारपण टाळता येते. 
 

Web Title: Stomach aches on one side? Does it hurt constantly? It's not just indigestion, it could be 'these' diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.