Join us

पोटात गडबड-छातीत जळजळ होतो? ‘हा’ उपाय करुन पाहा, पोटाला मिळेल थंडावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 19:52 IST

Diarrhea in Summer: पोटात गडबड असेल तर हा उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. 

Diarrhea in Summer: तापमान वाढलं की, शरीरात पाणी कमी होत असल्यानं पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या होणं कॉमन आहे. खासकरून जुलाब आणि अपचनासारख्या समस्या अधिक होतात. तुम्हाला सुद्धा या समस्या नेहमीच होत असतील तर यावर एक आयुर्वेदिक उपाय आहे.   न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी व्हिडीओ पोस्ट करून एक उपाय सांगितला आहे. पोटात गडबड असेल तर हा उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. 

काय आहे उपाय?

श्वेता शाह सांगतात की, जर पोट बिघडलं असेल आणि जर काही खाल्लं किंवा प्यायले तर टॉयलेट जावं लगात असेल तर तुम्हाला जुलाब झाले आहे. यावर तुम्ही एक आयुर्वेदिक उपाय करू शकता.

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, एक चमचा दह्यात ४ ते ५ कढीपत्ते आणि चिमुटभर हळद टाका. तुम्हाला हे मिश्रण फोडणी न देता असंच खायचं आहे. दिवसातून एकदा दुपारी हा उपाय करावा. यानं तुम्हाला लगेच आराम मिळेल. ४ ते ५ दिवस हा उपाय करा. पोटात गडबड होण्याची समस्या लगेच दूर होईल. 

कसा मिळतो फायदा?

दही, हळद आणि कढीपत्ते पोटासाठी खूप फायदेशीर असतात. दह्यात लॅक्टोबॅसिलस आणि बिफीडो बॅक्टेरिया सारखे प्रोबायोटिक्स असतात, जे आतड्यांचं आरोग्य सुधारतात आणि नुकसानकारक बॅक्टेरियासोबत लढतात.

कढीपत्त्यांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि पचन सुधारणारे गुण असतात. यानं आतड्या साफ होतात आणि त्यामुळे पचनक्रिया सुद्धा सुधारते. तसेच हळदीमध्ये नॅचरल अ‍ॅंटी-सेप्टिक गुण असतात, जे इन्फेक्शन कमी करण्यास मदत करतात. अशात तिन्ही गोष्टींचं मिश्रण पोटातील उष्णता, जळजळ कमी करण्यास मदत करतात.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स