Join us

बोलताना अचानक थुंकी उडाली तर खूप विचित्र वाटतं? १ उपाय, बोलताना कधीच उडणार नाही थुंकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 16:16 IST

How To Stop Spitting When You Talk :

बोलत असताना अचानक तोंडातून थुंकी बाहेर पडली तर कोणालाही अवघडल्यासारखं वाटू शकतं. यामुळे लोक केवळ तुमच्यापासून दूर जात नाहीत तर तुमचं इप्रेशनही कमी होते. तुमचे व्यक्तिमत्व कितीही आकर्षक असले तरी, बोलताना जर तुमच्या तोंडातून थुंकी निघाली तर त्याचा तुमच्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो. (How To Stop Spitting When You Talk)

बोलताना थुंकी का येते? (why do i always spit when i talk)

स्पीच थेरपी सेंटर नोएडाच्या स्पीच थेरपिस्ट डॉ कृष्णा कुमारी यांनी एका वेबसाईटशी बोलताना सांगितले की,  ''बोलताना जीभ, दात, ओठ, घसा, हिरड्या इत्यादींचा वापर केला जातो. काही शब्द जे आपल्याला उच्चारणे कठीण आहे, ते बोलताना थुंकी बाहेर येणं कॉमन आहे. (पण प्रत्येक शब्द बोलत असताना तोंडातून थुंकत येत असाल  तर त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही लोकांमध्ये लाळ जास्त प्रमाणात तयार होत असेल तर ते तोंडातून थुंकी येण्याचे मुख्य कारण ठरते. 

 

यावर नियंत्रण कसं ठेवायचं?

जर तुम्ही खूप वेगानं बोललात तर बोलता बोलता तुमच्या तोंडातून थुंकी नक्कीच बाहेर पडेल. त्यामुळे सर्वप्रथम तुमच्या बोलण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शांत मनाने स्वतःचे बोलणे ऐका. जर तुमचा बोलण्याचा वेग सामान्यपेक्षा जास्त असेल तर त्यावर नियंत्रण ठेवा. जोरजोरात बोलताना जीभ वारंवार हिरड्या आणि दातांना स्पर्श करते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लाळ तयार होते आणि बोलत असताना तोंडातून बाहेर पडू लागते.जर तुम्ही एखाद्याशी समोरासमोर बोलत असाल तर लक्षात ठेवा की बोलण्याचा वेग जास्त नसावा, जेणेकरून लाळ जास्त तयार होणार नाही. ज्यामुळे बोलताना थुंकी बाहेर पडणार नाही.

आहारातलं साखरेचं प्रमाण कमी ठेवा

जर तुमच्या अन्नात साखरेचे प्रमाण खूप जास्त असेल तर हे देखील जास्त लाळ निर्माण होण्याचे कारण असू शकते. आहारातील साखर कमी करा. साखर कमी केल्याने या समस्येपासून सुटका मिळत असेल, तर हे सर्वोत्तम आहे.  डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वैयक्तिक नियंत्रण आणि नैसर्गिक उपायांनीही या समस्येपासून सुटका होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ईएनटी तज्ज्ञांचे असे मत आहे की अनेक वेळा तोंडात संसर्ग झाल्यामुळे, कोणत्याही औषधाच्या दुष्परिणामामुळे तोंडात लाळ जास्त प्रमाणात येऊ लागते. अशा स्थितीत योग्य औषधोपचारांनी आराम मिळू शकेल. 

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइल