शरीराचा प्रत्येक अवयव स्वच्छ ठेवणे गरजेचे असते. हात, पाय, केस, त्वचा, चेहरा सगळंच आपण छान स्वच्छ करतो. आजकाल तर प्रदूषणाचे प्रमाण फारच जास्त वाढले आहे. (Soil stuck in the nails? does not come out? 2 solutions - clean nails in 2 minutes)त्यामुळे बाहेरून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषाणू तसेच किटाणूंचा शरीराला त्रास होऊ नये, यासाठीही स्वच्छ राहणे गरजेचे असते. आपण चेहर्यावरची माती तर साफ करतोच. मानेवर साचणारा मळही काढून टाकतो. पाठीपर्यंत हात पोहचत नाही, तरी कष्ट घेऊन पाठ साफ करतो. मात्र एक अवयव राहूनच जातो जेथे सगळ्यात जास्त माती साचते. (Soil stuck in the nails? does not come out? 2 solutions - clean nails in 2 minutes)तो अवयव म्हणजे नखे. हाताच्या तसेच पायाच्या बोटांवरील नखांमध्ये भरपूर माती अडकलेली असते.
आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. लहान मुले मातीत खेळतात, त्याच्या नखांमध्ये तर भरपूर माती असते. मुलांना नखे कुरतडण्याची सवय असते. त्यामुळे ती माती पोटात जाते. मग जंतांचा त्रास होतो. तसेच इतरी आजार होऊ शकतात. आजकाल लाँग नेल्स ठेवण्याची फॅशन आहे. मुली नखे कापत नाहीत लांब वाढवतात. त्या नखांवर छान नेलपॉलिश लावतात. त्यामुळे नखात अडकलेली घाण पटकन दिसूनही येत नाही. पण ती घाण काढणे गरजेचे असते. नखांच्या कोपऱ्यांमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी हे सोपे उपाय करून बघा.
१. दात घासायला आपण जो ब्रश वापरतो तसाच एक ब्रश नखांसाठीही वापरायला सुरवात करा. नखांना शाम्पू लावा. छान चोळा नंतर मऊ ब्रशचा वापर करून नखे घासा. थोड्या गुदगुल्या होतात मात्र मळ सगळा निघून जातो.
२. नेलकटरच्या मागच्या बाजूला नखे साफ करण्यासाठी काही टुल्स दिलेली असतात. त्यांचा वापर करा. मात्र ते वापरताना माती बरेचदा आणखीच आत जाते. अशावेळी नखे थोडावेळ गार पाण्यामध्ये बुडवून ठेवा. नंतर साफ करा. जास्त कष्ट न घेता काम करता येते. माती अगदी सहज निघून जाते. नखे छान साफ होतात.
नखांची काळजी घ्या. नखे खराब ठेऊ नका. नखे खाऊ नका तसेच कुरतडू नका. नखांमधून पोटात जाणाऱ्या जंतांमुळे मोठे आजारही उद्धवू शकतात.