Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फक्त जास्त मीठ खाणंच नाही तर कमी मीठ खाणंही धोक्याचं, शरीर लगेच देतं 'हे' संकेत

फक्त जास्त मीठ खाणंच नाही तर कमी मीठ खाणंही धोक्याचं, शरीर लगेच देतं 'हे' संकेत

Sodium deficiency : जेव्हा मीठ शरीरात कमी होतं, तेव्हाही वेगवेगळ्या समस्या होतात. मिठाचं प्रमाण कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. काय आहेत हे संकेत पाहुया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:24 IST2025-07-03T17:23:55+5:302025-07-03T17:24:20+5:30

Sodium deficiency : जेव्हा मीठ शरीरात कमी होतं, तेव्हाही वेगवेगळ्या समस्या होतात. मिठाचं प्रमाण कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. काय आहेत हे संकेत पाहुया.

Sodium deficiency : Symptoms of lack of salt or sodium in body | फक्त जास्त मीठ खाणंच नाही तर कमी मीठ खाणंही धोक्याचं, शरीर लगेच देतं 'हे' संकेत

फक्त जास्त मीठ खाणंच नाही तर कमी मीठ खाणंही धोक्याचं, शरीर लगेच देतं 'हे' संकेत

Sodium deficiency : शरीर फिट आणि हेल्दी ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पोषक तत्वांची गरज असते. यातीलच एक म्हणजे मीठ आहे. मीठ शरीराची सोडिअमची गरज पूर्ण करतं. अनेकदा आपणं ऐकलं असेल की, मीठ कमी खायला हवं. जर मीठ जास्त खाल्लं तर हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढतो. पण जेव्हा मीठ शरीरात कमी होतं, तेव्हाही वेगवेगळ्या समस्या होतात. मिठाचं प्रमाण कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. काय आहेत हे संकेत पाहुया.

मीठ कमी झाल्याचे संकेत

डोकेदुखी

शरीरात मीठ कमी झाल्यावर डोकेदुखीची समस्या होऊ शकते. मिठामध्ये सोडिअम असतं. जेव्हा शरीरात सोडिअमचं प्रमाण कमी होतं, तेव्हा शरीर डिहायड्रेट होतं. अशात डोकेदुखी होऊ शकते.

मळमळ आणि उलटी

शरीरात सोडिअमचं प्रमाण असंतुलित झाल्यावर फ्लूइडचं संतुल बिघडतं. ज्यामुळे डोकं गरगरणे, चक्कर येणे किंवा मळमळ अशा समस्या जाणवू शकतात.

थकवा आणि कमजोरी

सोडिअम कमी झाल्यावर स्नायू आणि नर्व्ह फंक्शन योग्यपणे काम करत नाहीत. अशात शरीरात थकवा अधिक जाणवतो. तसेच एनर्जी सुद्धा कमी जाणवते.

चक्कर येणे

सोडिअम कमी झाल्याचा प्रभाव ब्लड प्रेशरवर पडतो. ब्लड प्रेशर कमी झाल्यावर कमजोरी, थकव्यासोबतच चक्कर येण्याची समस्या होऊ शकते.

भूक कमी लागणे

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, सोडिअम कमी झाल्यावर भूक कमी लागते. अशात शरीराला पुरेसं पोषण मिळत नाही, ज्यामुळे इतरही समस्या होतात. इम्यूनिटी कमजोर होते.

किती मीठ आवश्यक?

एका रिपोर्टनुसार, भारतातील लोक रोज जवळपास ११ ग्रॅम मीठ खातात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, दिवसभरात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. यापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास गंभीर समस्या होतात.

काय होतात नुकसान

इन्सुलिन रेजिस्टेंस

एक्सपर्टनुसार, सोडिअमची कमतरता झाल्यावर शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसची समस्या बघायला मिळते. जी अनियंत्रित ब्लड शुगर आणि इन्सुलिनचं कारण ठरू शकते. यानं टाइप २ डायबिटीस आणि इतर गंभीर आजारांचा धोका वाढतो.

हार्ट डिजीज

सोडिअम शरीरात कमी झाल्यामुळे हृदयाचं देखील नुकसान होतं. कमी सोडिअममुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढू शकतो.

कोलेस्टेरॉल

काही रिसर्चमधून समोर आलं आहे की, कमी सोडिअम असलेल्या आहारानं एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण वाढण्याचा धोका असतो. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका वाढतो.

Web Title: Sodium deficiency : Symptoms of lack of salt or sodium in body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.