Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

स्मार्टफोनचं व्यसन हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील एक आव्हान बनलं आहे. ज्याने आपली कनेक्ट होण्याची, काम करण्याची आणि आराम करण्याची पद्धत बदलली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 14:43 IST2024-12-07T14:42:04+5:302024-12-07T14:43:20+5:30

स्मार्टफोनचं व्यसन हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील एक आव्हान बनलं आहे. ज्याने आपली कनेक्ट होण्याची, काम करण्याची आणि आराम करण्याची पद्धत बदलली आहे.

smartphone addiction has quietly become one of the most pervasive challenges of modern life | स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

स्मार्टफोनच्या व्यसनामुळे होतात 'हे' गंभीर आजार; लक्षणं दिसताच व्हा अलर्ट, चिमुकल्यांना धोका

स्मार्टफोनचं व्यसन हे आपल्या आधुनिक जीवनशैलीतील एक आव्हान बनलं आहे. ज्याने आपली कनेक्ट होण्याची, काम करण्याची आणि आराम करण्याची पद्धत बदलली आहे. पण आता फोनवर सतत एक्टिव्ह राहिल्याची किंमत मोजावी लागत आहे. जसं की या गोष्टीचा झोपेवर, मानसिक आरोग्यावर आणि अगदी नातेसंबंधांवर बराच परिणाम होतो. 

स्मार्टफोनच्या व्यसनाला सार्वजनिक आरोग्य महामारी म्हणतात. स्पेनने एक धाडसी पाऊल उचलण्याचा प्रस्ताव दिला आहे. ज्यामध्ये सिगारेटच्या पाकिटांसारखंच देशात विकल्या जाणाऱ्या सर्व स्मार्टफोनवर आरोग्यविषयक इशारा अनिवार्य करायला हवा असं म्हटलं आहे.  तसेच अतिरिक्त स्क्रीन टाईमच्या जोखमींबद्दल जागरुकता वाढवणं आणि सावधगिरीने वापर करण्यास प्रोत्साहित करणं हा या धाडसी पावलामागचा उद्देश आहे.

जे लोक खूप एक्टिव्ह असतात आणि दीर्घकाळ स्मार्टफोन वापरतात त्यांच्यामध्ये हृदय व स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात वाढतो. वजन आणि प्रेशर कंट्रालमध्ये असलं तरी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. हा रिसर्च १९९० आणि १९९१ मध्ये जन्मलेल्या १४,५०० मुलांवर करण्यात आला आहे.

जास्त स्क्रीन टाईममुळे होतात हृदयविकार 

रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, जी मुलं जास्त फोन आणि टॅब पाहतात, त्यांची शारीरिक हालचाल कमी होते. मुलं हल्ली फोनवर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे ते गंभीर इकोकार्डियोग्राफी आजाराने ग्रस्त होतात. तसेच ते फिजिकली इनएक्टिव्ह असतात.

'या' आजारांचा वाढतो धोका 

जी मुलं शारीरिकदृष्ट्या एक्टिव्ह नसतात. त्यांना अगदी लहान वयात लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेह होतो. अशा मुलांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढतो. अशा मुलांमध्ये न्यूरोडीजनरेटिव्ह आजार आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. आजकालची मुलं फोनमुळे समाजापासून दूर जात आहेत.

जास्त स्मार्टफोन वापरण्याचे तोटे

- कॉम्पूटर व्हिजन सिंड्रोम

- पाठीच्या कण्यावर गंभीर परिणाम

- त्वचेशी संबंधित समस्या

- झोपेशी संबंधित समस्या

- वाढलेला मानसिक ताण

- आत्मविश्वासाचा अभाव
 

Web Title: smartphone addiction has quietly become one of the most pervasive challenges of modern life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.