Sleeping Habits : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांच्या झोपेसंबंधी सवयी खूपच बदलल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत काम करणं, मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप बघणं यामुळे झोप पूर्ण होत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. मात्र अनेकांना हे माहीत नसतं की, त्यांची झोपण्याची एक सवय त्यांना ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकते. चला तर पाहुयात अशा सवयीबाबत ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो.
झोपेनं आपल्या शरीराला केवळ आराम मिळतो असं नाही तर ही अशी नॅचरल प्रक्रिया आहे ज्यात शरीर स्वत:ला रिपेअर करतं. जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो, तेव्हा हृदय देखील योग्यपणे काम करतं. जर झोप पूर्ण झाली नाही किंवा कमी झोप घेत असाल तर हाय ब्लड प्रेशर, हार्ट डिजीज आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. त्यामुळे झोपणं आणि झोपेची किंवा झोपेतून उठण्याची एक फिक्स वेळ ठवणं खूप महत्वाचं ठरतं.
ब्लड प्रेशर कंट्रोल
जेव्हा आपण झोपतो तेव्हा आलं ब्लड प्रेशर स्वाभाविकपणे कमी असतं, ज्यामुळे हृदय आणि धमण्यांना आराम मिळतो. जर झोप पूर्ण झाली नाही तर ब्लड प्रेशर हाय राहतं, ज्यामुळे हायपरटेंशनची समस्या होऊ शकते. नियमितपणे झोप घेतल्यानं शरीराचं सर्केडियन रिदम योग्य राहतं, अशात बीपीही कंट्रोल राहतो.
हृदयरोगांचा धोका कमी
जे लोक रोज किमान 7 ते 8 तास झोप घेतात, त्यांना हार्ट अॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी राहतो. झोप जर कमी घेतली तर शरीरात चिंता वाढवणारे हार्मोन वाढतात, जे हृदयासाठी नुकसानकारक असतात. तसेच झोप घेतल्यानं कोलेस्टेरॉल आणि ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोल राहते.
तणाव आणि सूज कमी होते
जर नियमितपणे झोप घेत नसाल तर शरीरात सूज वाढते, ज्यामुळे धमण्यांचं नुकसान होतं. नियमित पुरेशी झोप घ्याल तर सूज कमी होते आणि हृदयाची काम करण्याची क्षमताही सुधारते. ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
काय तयारी कराल?
झोपण्याचं एक फिक्स शेड्यूल तया करा. कधी झोपायचं आणि कधी झोपेतून उठायचं हे ठरवा. मग ते कामाचे दिवस असो कि सुट्टीचे.
बेडरूममधील वातावरण शांत ठेवा. अंधार ठेवा आणि हवाही खेळती असली पाहिजे.
झोपण्याआधी मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप बघू नका. झोपण्याच्या 2 तासांआधी जेवण करा.
झोपण्याआधी कॉफी किंवा चहा पिऊ नका. तसेच रात्री जास्त जड जेवण करू नका.