रात्री अनेकादा एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर गेलं तरी झोप लागत नाही. खूप वेळ जागं राहावं लागतं. झोप पू्र्ण झाली नाही तर सकाळी उठायला त्रास होतो. आळस, थकवा जाणवतो. धकाधकीच्या जीवनात शांत झोप लागणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण हल्ली प्रत्येकाचीच नीट झोप लागत नसल्याची तक्रार असलेली पाहायला मिळते. आठ तासांची उत्तम झोप म्हणजे सध्या सुख मानलं जात. याच दरम्यान आता स्लीप टूरिझ्म हा एक नवा ट्रेंड उद्यास आला आहे. शांत झोपेसाठी लोक लांबचा प्रवास करत आहेत.
काय आहे स्लीप टूरिझ्म?
स्लीप टूरिझ्म म्हणजे अशा ठिकाणी प्रवास करायचा जिथे आपल्याला शांत झोप लागेल. यामध्ये झोप ही आपली प्राथमिकता आहे. पूर्वी हॉटेल्समध्ये फक्त आरामदायी बेड मिळत असत, परंतु आता संपूर्ण प्रवासाचा अनुभव हा तुमची झोप सुधारण्यासाठी डिझाईन केला आहे.
- आठवड्याभर छान झोप लागण्यास मदत होते
- काही मेडिकल लीडेड प्रोग्राम असतात
- झोपेला चालना देणाऱ्या स्पा ट्रीटमेंटस देतात
का वाढतोय ट्रेंड?
लोक आधी आरोग्य हे फक्त आहार आणि फिटनेसपुरतं मर्यादित मानत असत, परंतु आता झोपेलाही तेवढेच महत्त्व दिलं जात आहे. लोकलसर्कलच्या 'हाऊ इंडिया स्लीप्स' सर्वेक्षणानुसार, भारतातील ६१% लोक ६ तासांपेक्षा कमी झोप घेतात. अशा परिस्थितीत, स्लीप टुरिझम लोकांना तणावमुक्त करण्याची आणि स्वतःशी कनेक्ट होण्याची संधी देतं.
भारतात कुठे अनुभवता येईल स्लीप टुरिझ्म?
आनंदा इन द हिमालयाज, ऋषिकेश - योग निद्रा, शिरोधारा आणि मेडिटेशनसाठी प्रसिद्ध.
आत्मनन वेलनेस रिसॉर्ट, मुळशी - 'रेस्ट अँड रिजुव्हेनेशन' कार्यक्रम, जिथे योग आणि स्पा थेरपी तणाव कमी करण्यास मदत करते.
स्वास्वरा, गोकर्ण - टेक-फ्री लाईफस्टाईल, आयुर्वेद आणि माइंडफुलनेसचा संगम.
वन, डेहराडून - साऊंड हिलिंग, आयुर्वेदिक उपचार आणि जंगलासारख्या वास्तुकलेचा अनुभव.