Join us

व्हायरसमुळे होतोय स्किन कॅन्सर, संशोधकांचा दावा; व्हायरल इन्फेक्शनमुळे समजला कॅन्सरचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:54 IST

Skin Cancer Cause : वैज्ञानिकांना आढळलं की, आपल्या त्वचेवर राहणाऱ्या एका सामान्य व्हायरसमुळे स्किन कॅन्सर होतो.

Skin Cancer Cause : कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यातील जगभरातील एक सगळ्यात कॉमन प्रकार म्हणजे स्किन कॅन्सर म्हणजेच त्वचेचा कॅन्सर. साधारणपणे त्वचेचा कॅन्सर शरीराच्या अशा भागात होतो, जो भाग उन्हाच्या संपर्कात अधिक राहतो. उन्हाची नुकसानकारक किरणे स्किन कॅन्सरच्या सुरूवातीचं कारण मानली जातात. अशात अलिकडे वैज्ञानिकांनी स्किन कॅन्सरबाबत एक नवीन खुलासा केलाय.

वैज्ञानिकांना आढळलं की, आपल्या त्वचेवर राहणाऱ्या एका सामान्य व्हायरसमुळे स्किन कॅन्सर होतो. हा व्हायरस आधी इतका घातक समजला जात नव्हता. हा व्हायरस खासकरून इम्यूनिटी कमजोर असलेल्या व्यक्तींना शिकार बनवतो. हा व्हायरस आहे बीटा-एचपीव्ही (beta hpv virus). जो एचपीव्ही व्हायरसचा एक प्रकार आहे.

ह्यूमन पेपिलोमा व्हायरस जगातील सगळ्यात कॉमन व्हायरसपैकी एक आहे. याचे जवळपास २०० प्रकार आहेत. बीटा-एचपीव्ही त्यातील एक आहे. ज्याचा आतापर्यंत स्किन कॅन्सरसोबत थेट संबंध जोडण्यात आला नव्हता. मात्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या वैज्ञानिकांना या गोष्टीचे पुरावे मिळाले आहेत की, हा सामान्य बीटा-एचपीव्ही व्हायरस स्किन कॅन्सरचं कारण बनू शकतो. 

काय आहे केस?

एका महिलेवर उपचार करत असताना या शोध लावण्यात आला. महिलेला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा नावाचा स्किन कॅन्सर झाला होता. अनेक उपाय करूनही कॅन्सर पुन्हा होत होता. महिलेची स्किन सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानपासून रिपेअर होत नाहीये आणि तिची कमजोर इम्यूनिटी व्हायरसला नियंत्रित करू शकत नाहीये. पण नंतर वेगळंच कारण समोर आलं.

डीएनएमध्ये व्हायरस

डॉक्टरांना आढळून आलं की, बीटा-एचपीव्ही व्हायरस महिलेच्या स्किन सेल्सच्या डीएनएमध्ये शिरला होता आणि व्हायरल प्रोटीन बनवत होता. याचा अर्थ होता की, त्वचेच्या कोशिकांना पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतलं होतं. 

कमजोर इम्यून सिस्टीम कारणीभूत

ज्या महिलेमुळे वैज्ञानिकांना हा शोध लावता आला त्या महिलेची इम्यूनिटी कमजोर होती. ज्यामुळे महिलेचे टी सेल्स योग्यपणे काम करत नव्हते. ज्यामुळे व्हायरस लढण्याची क्षमता कमी झाली होती. त्यामुळे व्हायरस शरीरात प्रोटीन बनवत होतं आणि कॅन्सर पुन्हा पुन्हा परत येत होता. महिलेवर वेगळ्या पद्धतीने उपचार करण्यात आले आणि त्यानंतर तिच्या कॅन्सर परत आला नाही.

या घटनेतून हे समोर आलं की, कमजोर इम्यून सिस्टीम असलेल्या लोकांमध्ये बीटा-एचपीव्ही व्हायरस त्वचेच्या कोशिका ताब्यात घेऊन स्किन कॅन्सरचं कारण बनू शकतो. 

टॅग्स : कर्करोगकॅन्सर जनजागृतीहेल्थ टिप्सआरोग्य