आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धतींमध्येही बदल झालेला दिसून येत आहे आधी लोक जमीनिवर बसून जेवायचे तर आता डायनिंग टेबलवर बसून किंवा बेडवर बसून खाणं पसंत कतात. पण खाली बसून जेवल्यानं तुमच्या तब्येतीला बरेच फायदे मिळतील. पाहा नीट मांडी घालून जमिनीवर बसून जेवणाचे फायदे.
(Sitting On The Floor And Eating Scientific Reason)
जमिनीवर बसून जेवल्यानं काय फायदे मिळतात?
जमिनीवर बसून मांडी घालून जेवल्यानं शरीरी नैसर्गिकरित्या फ्लेक्सिबल राहतं. जेव्हा तुम्ही जमिनीवर बसता तेव्हा पचनक्रिया एक्टिव्ह होते या पोजिशनला योगामध्ये सुखासन म्हणतात. ज्यामुळे जेवताना पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. यामुळे मांसपेशी स्ट्रेच करता येतात तसंच ब्लड सर्क्युलेशनही चांगले राहते. याशिवाय पोट लवकर भरण्यासही मदत होते. जुन्या काळातही लोक याच स्थितीत बसून जेवायचे.
एशियन इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंन्सचे एक्सपर्ट्स सांगतात खाली बसून जेवणं फक्त गट हेल्थसाठीच नाही तर माईंडसाठीही चांगले असते. तुम्ही जमिनीवर बसून हळूहळू जेवता तेव्हा मेंदूला पोट भरल्याचे संकेत मिळतात. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यासही मदत होते. याशिवाय सांध्यासाठीही फायदेशीर ठरते. तर तुम्ही दीर्घकाळ हीच सवय ठेवली तर ब्लड प्रेशरसारख्या आजारांपासूनही आराम मिळतो.
न्युट्रिशन एक्सपर्ट्सच्यामते रिकाम्यापोटी काही पदार्थांचे सेवन केल्यामुळे एनर्जीवर परिणाम होतो. रिकाम्या पोटी तुम्ही कोमट पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ शकता. त्यानंतर बदाम, अक्रोड, अंजीर खाणं फायदेशीर मानलं जातं. हेल्दी स्किन आणि चांगल्या पचनासाठी पपई किंवा सफरचंद खाणं फायदेशीर ठरतं. तसंच गरम दूध किंवा हळदीचं दूध शरीर डिटॉक्स करून इम्यूनिटी वाढवण्यासही मदत करते.
पलंगावर बसून का खाऊ नये?
पलंगावर बसून खाणं ही एक चुकीची सवय आहे. बेडवर बसताना शरीराची पोश्चर योग्य नसेत. ज्यामुळे अन्न चावणं आणि पचन कठीण होतं. यामुळे गॅस, एसिडीटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. याव्यतिरिक्त पलंगावर बसून जेवल्यानं स्वच्छतेशी निगडीत समस्या उद्भवू शकतात.
