Join us

सतत जांभई येणं सामान्य गोष्ट नाही; मोठ्या आजाराचे असू शकतात संकेत, कसा टाळाल धोका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 13:03 IST

ऑफिसमध्ये नेहमीच आळस, झोप येते का? जर असं होत असेल तर हा सामान्य थकवा नसून आरोग्यासंबंधित गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं.

तुम्हाला दिवसभर सतत जांभई येते का? ऑफिसमध्ये नेहमीच आळस, झोप येते का? जर असं होत असेल तर हा सामान्य थकवा नसून आरोग्यासंबंधित गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. अमेरिकन अकॅडमी ऑफ स्लीप मेडिसिन (AASM) च्या एका नवीन पोझिशन पेपरनुसार, सतत जांभई येणं हे झोपेच्या कमतरतेचं आणि स्लीप डिसऑर्डरचं लक्षण असू शकतं.

या रिसर्चनुसार, दिवसा जास्त झोप येणं हा फक्त आळस नाही तर त्यामुळे अपघात, घरात किंवा कामाच्या ठिकाणी चुका, मानसिक समस्या आणि दीर्घकालीन आजार देखील होऊ शकतात. ही स्थिती बहुतेकदा अशा लोकांमध्ये दिसून येते ज्यांना पुरेशी आणि चांगली झोप मिळत नाही. एएएसएमचे अध्यक्ष डॉ. एरिक ओल्सन म्हणतात की, झोपेचा अभाव ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे, ज्यामुळे आरोग्य समस्या वाढत आहेत.

सतत जांभई येण्याचं कारण काय?

- झोपेचा अभाव

- झोपेचे आजार जसं की ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनिया किंवा नार्कोलेप्सी

- तणाव आणि डिप्रेशन

- औषधांचे दुष्परिणाम

- अनियमित जीवनशैली 

-  रात्री उशिरापर्यंत फोनचा वापर

कोणते धोके असू शकतात?

- मानसिक थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण

- गाडी चालवताना अपघाताचा धोका

- कामात चुका करणे

- आत्महत्येचे विचार

- चिडचिडेपणा आणि चिंता

ही समस्या कशी टाळायची?

- दररोज कमीत कमी ७-८ तास झोप घ्या.

- झोपण्याची आणि उठण्याची वेळ ठरवा.

- झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा

- कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित करा

- गरज पडल्यास आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

डॉक्टरांच्या मते, सतत जांभई येणं हे केवळ थकव्याचे लक्षण नाही. शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नसल्याचा हा इशारा आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठा आजार होऊ शकतो. म्हणून, झोपेला प्राधान्य द्या आणि निरोगी जीवनासाठी जागरूक राहा.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य