Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुमचंही सारखं डोकं दुखतं- ॲसिडीटी वाढते? फक्त ५ दिवस 'हा' उपाय करा, त्रास कायमचा संपेल.. 

तुमचंही सारखं डोकं दुखतं- ॲसिडीटी वाढते? फक्त ५ दिवस 'हा' उपाय करा, त्रास कायमचा संपेल.. 

Simple Home Hacks For Instant Relief From Acidity And Headache: काही महिलांचं सतत डोकं दुखत असतं. बघा काय असू शकतात त्यामागची कारणं..(how to get rid of acidity and headache?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2025 17:29 IST2025-06-11T17:28:38+5:302025-06-11T17:29:18+5:30

Simple Home Hacks For Instant Relief From Acidity And Headache: काही महिलांचं सतत डोकं दुखत असतं. बघा काय असू शकतात त्यामागची कारणं..(how to get rid of acidity and headache?)

simple home hacks for instant relief from acidity and headache, what are the reasons for headache, how to get rid of acidity and headache | तुमचंही सारखं डोकं दुखतं- ॲसिडीटी वाढते? फक्त ५ दिवस 'हा' उपाय करा, त्रास कायमचा संपेल.. 

तुमचंही सारखं डोकं दुखतं- ॲसिडीटी वाढते? फक्त ५ दिवस 'हा' उपाय करा, त्रास कायमचा संपेल.. 

Highlightsहा त्रास अवघ्या ४ ते ५ दिवसांत कायमचा कसा कमी करायचा यासाठीचा हा खास उपाय..

'आज माझं खूपच डोकं दुखत आहे', 'डोकं पार ठणकायला लागलं आहे..', 'ॲसिडीटीचा भयंकर त्रास होतो आहे..' अशी वाक्यं आपण आपल्या आसपासच्या महिलांकडून नेहमीच ऐकत असतो. किंवा आपणही ती नेहमीच म्हणत असतो. काही महिलांचं तर आठवड्यातून ३- ४ वेळा हमखास डोकं दुखतं. त्यामुळे तर बऱ्याचदा त्यांच्या जवळच्या व्यक्तींकडून याबाबत त्यांची चेष्टाही केली जाते. डोकेदुखीसाठी इतरही अनेक कारणं आहेतच. पण ॲसिडीटी वाढल्यामुळे डोकं दुखण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. काही जणांना खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये, सवयींमध्ये किंचित बदल झालेलाही चालत नाही. त्यांना लगेच ॲसिडीटी होते आणि मग डोकेदुखी छळू लागते (simple home hacks for instant relief from acidity and headache). हा त्रास अवघ्या ४ ते ५ दिवसांत कायमचा कसा कमी करायचा यासाठीचा हा खास उपाय..(how to get rid of acidity and headache?)

 

डोकेदुखी, ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी उपाय 

डोकेदुखी आणि ॲसिडीटीचा त्रास कायमचा कमी करण्यासाठी काय उपाय करता येईल याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी thefoodideas या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

मुलांना डब्यात काय द्यावं हा रोजचाच प्रश्न? ६ चटपटीत, पौष्टिक पदार्थ- मुलं एन्जॉय करत खातील

यामध्ये त्या सांगतात की एका ग्लासमध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळा. यानंतर त्यामध्ये एक चिमूटभर काळे मीठ, चिमूटभर हिंग आणि १ टीस्पून मीरेपूड घाला. आता यामध्ये फक्त २ चमचे गरम पाणी घालावं. पाण्याचं प्रमाण वाढवून ग्लासमधलं मिश्रण मुळीच डायल्यूट करू नका. आता सगळं पाणी व्यवस्थित हलवून घ्या आणि प्या. 

 

जेवणाच्या अर्धा तास आधी या पद्धतीने पाणी प्या आणि त्यानंतर मध्ये काहीही न खाता थेट अर्ध्या तासाने जेवायला बसा. हा उपाय जर तुम्ही सलग ५ दिवस केला तर ॲसिडीटीचा आणि डोकेदुखीचा त्रास कमी होईल.

लग्नसराईमध्ये एकदम युनिक मेहेंदी काढायची? 'या' पद्धतीने ChatGPT ला विचारा, डिझाईन्स मिळतील खास

लिंबू, मीरेपूड, हिंग आणि काळे मीठ या पदार्थांमुळे पचनक्रिया व्यवस्थित होईल. त्यामुळे ॲसिडीटी तर होणार नाहीच, पण त्यासोबतच पोट फुगणे, गॅसेस होणे असे त्रासही होणार नाहीत असं आहारतज्ज्ञ सांगतात. करून बघा. 


 

Web Title: simple home hacks for instant relief from acidity and headache, what are the reasons for headache, how to get rid of acidity and headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.