Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

आजच्या काळात ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका 'सायलेंट किलर'सारखं आहे जे शरीराला  हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:02 IST2025-05-19T12:57:28+5:302025-05-19T13:02:17+5:30

आजच्या काळात ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका 'सायलेंट किलर'सारखं आहे जे शरीराला  हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत.

silent killer disease hypertension in young adults and teens symptoms precaution treatment risk management | तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

तरुणांसाठी 'सायलेंट किलर' ठरतोय 'हा' आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षणं

एक काळ असा होता जेव्हा हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजार वृद्ध लोकांशी संबंधित मानला जात होता, परंतु आता ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका 'सायलेंट किलर'सारखं आहे जे शरीराला  हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत.

आरोग्याशी संबंधित अनेक रिपोर्टमधून असं दिसून आलं आहे की, हाय ब्लड प्रेशर ही केवळ ब्लड प्रेशरची समस्या नाही तर ती मेटाबॉलिक डिसफंक्शन, सबक्लिनिकल एथेरोस्क्लेरोसिस आणि फॅटी लिव्हर सारख्या अनेक गंभीर आजारांशी देखील संबंधित आहे. सामान्य आरोग्य चाचण्यांमध्ये या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, कधीकधी हृदयासंबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणं अशा लोकांमध्ये देखील आढळतात ज्यांच्यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. तसेच काही लोकांमध्ये  फॅटी लिव्हरची समस्या देखील आढळून आली.

हाय ब्लड प्रेशरच्या वाढत्या धोक्याबद्दल दिल्लीतील प्रसिद्ध डॉक्टर सुरंजित चॅटर्जी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, हाय ब्लड प्रेशर हा एक सायलेंट आजार आहे, जो अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय विकसित होतो. जर तो वेळीच नियंत्रित केला नाही तर ते हृदयरोग, स्ट्रोक, किडनी समस्या आणि इतर अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो.

हाय ब्लड प्रेशर का आणि कसं होतं?

डॉ. चॅटर्जी यांच्या मते, हाय ब्लड प्रेशर अनेक कारणं आहेत. यामध्ये लाईफस्टाईल, पर्यावरण आणि अनुवांशिक घटक महत्त्वाचे आहेत. याची इतरही अनेक कारणं आहेत.

- वाढतं वय 
- मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
- जास्त वजन किंवा लठ्ठपणा
- शारीरिक हालचालींचा अभाव
- दारू आणि धूम्रपान
- ताणतणाव
- फॅमिली हिस्ट्री 
-  किडनीचा आजार किंवा हार्मोनल डिसबॅलेन्स

हाय ब्लड प्रेशरचे संभाव्य धोके

जर हाय ब्लड प्रेशरवर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते शरीराच्या अनेक महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतं.

- हृदयरोग (जसं की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, अनियमित हृदयाचे ठोके)
- न्यूरोलॉजिकल समस्या (जसं की स्ट्रोक)
- किडनीचा आजार आणि किडनी फेल्युअर
- डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचे नुकसान, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
- पायांना रक्तपुरवठा कमी होणं.
- जेव्हा मधुमेह आणि लठ्ठपणा एकत्र असतात तेव्हा धोका अनेक पटींनी वाढतो.

कसा रोखायचा 'हा' आजार? 

संतुलित आहार घ्या - मीठ कमी करा, फळं, भाज्या जास्त खा.

नियमित व्यायाम करा - हे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं.

अल्कोहोल आणि तंबाखू टाळा - हे ब्लड प्रेशर वाढवतात आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान करतात.

जास्त ताण घेऊ नका - योग, ध्यान, दीर्घ श्वास घेणं यासारख्या गोष्टींचा वापर करा.

नियमित तपासणी करा - लक्षणं नसली तरीही ब्लड प्रेशर होऊ शकतो.

Web Title: silent killer disease hypertension in young adults and teens symptoms precaution treatment risk management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.