Join us

शरीर सांगतं फुप्फुसं कमकुवत होत असल्याची लक्षणं, किरकोळ त्रासच ठरतात पुढे जिवघेणे आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:58 IST

Lungs Weak : जर वेळीच याकडे लक्ष दिलं तर त्रास कमी केला जाऊ शकतो. चला पाहुयात काय आहेत हे संकेत.

Lungs Weak : जसजसं आपलं वय वाढत जातं शरीरही हळूहळू कमजोर होतं. त्यामुळे वाढत्या वयात लवकर थकवा येण्याची समस्या वाढते. पण आजकालच्या लाइफस्टाईलसंबंधी काही चुकांमुळे कमी वयातच म्हातारपणासारख्या समस्या होऊ लागतात. यात काही फुप्फुसांसंबंधी समस्या असतात. फुप्फुसांची काम करण्याची क्षमता कमी झाल्यावर शरीर काही संकेत देऊ लागतं. जर वेळीच याकडे लक्ष दिलं तर त्रास कमी केला जाऊ शकतो. चला पाहुयात काय आहेत हे संकेत.

श्वास घेण्यास त्रास

पायऱ्या चढल्यावर, थोडं धावल्यावर किंवा वस्तू उचलल्यावर श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर हे फुप्फुसं कमजोर झाल्याचे संकेत असू शकतात. वाढत्या वयासोबतच फुप्फुसांची क्षमताही कमी होते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण होते. वेळीच टेस्ट केली तर यावर योग्य ते उपचार घेता येतील.

सतत खोकला

जर भरपूर दिवसांपासून आपल्याला खोकला असेल, खासकरून सकाळी किंवा धूळ-प्रदूषणाच्या संपर्कात आल्यावर तर हे फुप्फुसं कमजोर झाल्याचे संकेत असू शकतात. स्मोकिंग करणारे किंवा प्रदूषण असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना ही समस्या जास्त होते. क्रॉनिक ब्रोंकायटिस किंवा COPD (क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज) सारख्या आजाराची ही सुरूवातीची लक्षणं असू शकतात.

थकवा-कमजोरी

फुप्फुसं जर पूर्ण क्षमतेनं काम करत नसतील तर शरीराला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. ज्यामुळे व्यक्तीला सतत थकवा आणि सुस्ती जाणवते. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे शरीराची एनर्जी कमी होते आणि सामान्य काम केल्यानंही समस्या होऊ लागते.

छातीत जडपणा 

श्वास घेत असताना छातीत तर जडपणा किंवा आखडल्यासारखं वाटत असेल, शिटी वाजल्यासारखा आवाज येत असेल फुप्फुसांमध्ये काहीतरी गडबड आहे. हे अस्थमा, ब्रोंकायटिस किंवा फुप्फुसात सूज असल्याचे संकेत असू शकतात. वाढत्या वयात फुप्फुसाच्या नलिका कमजोर होतात, ज्यामुळे या समस्या वाढतात.

पुन्हा पुन्हा इन्फेक्शन

जर आपल्याला न्यूमोनिया, ब्रोंकायटिस किंवा इतर श्वासासंबंधी आजार पुन्हा पुन्हा होत असतील, तर हा फुप्फुसं कमजोर झाल्याचा इशारा असू शकतो. वाढत्या वयात इम्यूनिटी कमजोर होते आणि फुप्फुसातील इन्फेक्शनसोबत ठीकपणे लढू शकत नाही.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य