Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

Side Effects Of Using Plastic Steamer: सर्दी झाल्यानंतर तुम्हीही प्लास्टिकचं स्टीमर वापरून वाफ घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला एकदा वाचाच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 09:30 IST2025-06-21T09:24:46+5:302025-06-21T09:30:02+5:30

Side Effects Of Using Plastic Steamer: सर्दी झाल्यानंतर तुम्हीही प्लास्टिकचं स्टीमर वापरून वाफ घेत असाल तर डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला एकदा वाचाच..

side effects of using plastic steamer, doctor suggests avoid using plastic steamer  | सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

सर्दी झाल्यावर प्लास्टिकच्या स्टीमरमधून वाफ घेता? डॉक्टरांनी दिली धोक्याची सूचना, वाफ घ्यायचीच तर...

Highlightsआपण सर्दी झाल्यानंतर जास्त जोरात वाफ घेतो, जेणेकरून वाफ छातीत खोलवर जाईल. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगले नाही. 

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. आता पावसाळा म्हटलं की घरोघरी सर्दी, खोकला, कफ, घसादुखी असा त्रास होणारे रुग्ण दिसतात. लहान मुलं शाळेत जातात आणि तिथून सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन घेऊन येतात. आपल्याला माहितीच आहे की सर्दी झाल्यानंतर तिच्यावरचा सगळ्यात उत्तम मानला जाणारा नैसर्गिक उपाय म्हणजे वाफ घेणे. वाफ घेतल्यानंतर सर्दी बऱ्याच प्रमाणात कमी होते. पण हल्ली ९० टक्के लोक वाफ घेताना एक मोठी चूक करत आहेत आणि ती चूक आरोग्यासाठी त्रासदायक ठरणारी आहे, असं डॉक्टर सांगत आहेत.(Side Effects Of Using Plastic Steamer)

 

तुम्हीही वाफ घेण्यासाठी प्लास्टिकचं स्टीमर वापरता का?

वाफ घेण्यासाठी हल्ली घरोघर प्लास्टिकचे स्टीमर वापरले जातात. amarujala and richaaniruddha या इंस्टाग्राम पेजवर जी माहिती शेअर करण्यात आली आहे, त्यामध्ये डॉक्टर असं सांगतात की ज्याप्रमाणे स्वयंपाकासाठी आपण प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर करत नाही, त्याचप्रमाणे वाफ घेण्यासाठीही प्लास्टिकच्या स्टीमरचा वापर करू नये.

पावसाळ्यात 'या' भाज्या खाणं म्हणजे आजारांना आमंत्रण; अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी तर चुकूनही खाऊ नये..

प्लास्टिकच्या स्टीमरमध्ये पाणी खूप जास्त गरम होतं. त्यामुळे एवढ्या उष्ण पाण्यामुळे प्लास्टिकच्या स्टीमरचे काही अंश तरी नक्कीच वितळून पाण्यात जात असणार. त्यात आपण सर्दी झाल्यानंतर जास्त जोरात वाफ घेतो, जेणेकरून वाफ छातीत खोलवर जाईल. हे आरोग्याच्या दृष्टीने अजिबातच चांगले नाही. 

 

तसेच स्टीमरमध्ये पाणी जेवढे गरम होते, खरंतर तेवढ्या गरम पाण्याची वाफ घेणेही शरीराच्या दृष्टीने चांगले नसते. त्यामुळे प्लास्टिकच्या स्टीमचा वापर टाळायला हवा.

योगामुळे बदलून गेलं 'या' सेलिब्रिटींचं आयुष्य!! म्हणूनच ते म्हणतात योगा म्हणजे आमच्यासाठी....

त्याऐवजी पारंपरिक पद्धतीने वाफ घेणे कधीही चांगले. त्यासाठी एक पातेले घ्या. त्या पातेल्यामध्ये पाणी गरम करा. आता टॉवेलने चेहरा झाकून वाफ घ्या. या पाण्यातून ती मंद वाफ येते ती तुमच्यासाठी पुरेशी असते, असं डॉक्टर सांगतात. 


 


 

Web Title: side effects of using plastic steamer, doctor suggests avoid using plastic steamer 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.