Ginger Side Effects : आल्याच्या वापर भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये केला जातो. याने पदार्थांचा टेस्ट तर वाढतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. आल्याने पचन तंत्र मजबूत राहतं, सूज कमी होते आणि इम्यून सिस्टीमही मजबूत राहतं. मात्र, ज्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीची अति नुकसानकारक असते, तेच आल्याबाबतही लागू पडतं. आल्याचा जास्त वापर केल्यानं शरीरावर नकारात्मक प्रभाव पडतो.
आल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. पण याच्या अधिक वापराने आरोग्यासंबंधी काही समस्या होऊ शकतात. त्यामुळे आल्याचा वापर कमी प्रमाणात केला पाहिजे. अशात आले अधिक खाल्ल्याने काय नुकसान होतात हे जाणून घेऊ.
जास्त आले खाण्याचे नुकसान
- आल्यामध्ये भरपूर प्रमाणात जिंजरोल नावाचं तत्व असतं. ज्यामुळे पचन तंत्र उत्तेजित होतं. याने पचनक्रिया व्यवस्थित होण्यास मदत मिळते. मात्र, आले जास्त खाल्ल्याने पोटात जळजळ आणि अॅसिडिटीची समस्या होऊ शकते.
- आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचे गुण असतात. जर तुम्ही याचा वापर जास्त केला तर रक्ताची गाठ तयार होऊ शकते. खासकरून अशा लोकांना जे रक्त पातळ करण्याचं औषध घेतात.
- काही लोकांना आल्यापासून एलर्जीही असते. अशात जास्त आले खाल्ल्याने त्वचेवर रॅशेज, खाज आणि इतर एलर्जीसंबंधी समस्या होऊ शकतात.
- आल्यामध्ये ब्लड शुगर कमी करण्याची क्षमता असते. अशात याच्या जास्त वापराने हायपोग्लायसीमिया लो ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. यात चक्कर येणे, कमजोरी आणि डोकेदुखी अशा समस्या होऊ शकतात.
- गर्भवती महिलांनी आले जास्त प्रमाणात खाऊ नये. यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो. कमी प्रमाणात आले खाणं गर्भवती महिलांसाठी सुरक्षित मानलं जातं. याने मळमळ आणि उलटी कमी करण्यास मदत मिळते.