Health Tips : बाहेर सूर्यप्रकाश कमी असला की, जास्तीत जास्त लोक ओले कपडे घराच्या आतच वाळत घालतात. घराघरांमध्ये ही सवय बघितली जाते. पण लिव्हिंग रूम किंवा बेडरूममध्ये कपडे टांगणे आपल्याला सामान्य वाटत असले, तरी यामुळे घरातील हवा आरोग्यास घातक होऊ शकते. या सवयीमुळे केवळ भिंतींचे नुकसान होतं असं नाही तर कुटुंबाच्या आरोग्यासही धोका निर्माण होतो. घरात कपडे वाळत घातल्याने काय काय गंभीर नुकसान होऊ शकतात, हेच आपण आज समजून घेऊया. जेणेकरून आरोग्य चांगलं ठेवता येईल.
घरात ओलावा वाढतो
ओले कपडे वाळताना हवेत ओलावा सोडतात. त्यामुळे घरातील वातावरण दमट आणि जड होतं. जास्त ओलाव्यामुळे भिंतींच्या कोपऱ्यांमध्ये, कपाटांच्या मागे आणि छतांवर काळी बुरशी तयार होते, जी घराचा पाया कमजोर करते.
घरात कपडे वाळवणे का धोकादायक आहे?
घराच्या आत कपडे वाळवल्यास दमा, हाय फिव्हर किंवा आधीपासून अॅलर्जी असलेल्या लोकांना अधिक त्रास होऊ शकतो. ब्रिटनमधील मॅकिन्टॉश स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या एका अभ्यासात हे स्पष्ट झाले आहे. या अभ्यासात असं आढळलं की घरातील एकूण ओलाव्यापैकी सुमारे एक तृतीयांश ओलावा घरात कपडे वाळवल्यामुळे वाढतो. ग्लासगो येथील मॅकिन्टॉश एन्व्हायर्नमेंटल आर्किटेक्चर रिसर्च युनिटनं १०० घरांवर अभ्यास केला. त्यात ८७% लोक थंड हवामानात कपडे घरातच वाळवत असल्याचं दिसून आलं.
बुरशी कशी तयार होते?
जेव्हा ओले कपडे घरात वाळवले जातात, तेव्हा सुमारे २ लिटर पाणी हवेत सोडलं जातं. योग्य व्हेंटिलेशन नसल्यास हा ओलावा तसाच राहतो आणि भिंती, छत तसेच कपड्यांवरही बुरशी वाढते.
तज्ज्ञांच्या मते, बुरशीच्या संपर्कात आल्यास दमा, COPD किंवा सिस्टिक फायब्रोसिससारख्या आजारांनी त्रस्त लोकांना गंभीर त्रास होऊ शकतो. दीर्घकाळ बुरशीच्या कणांच्या संपर्कात राहिल्याने श्वसनमार्गात सूज येते आणि काही प्रकरणांमध्ये हा धोका जीवघेणाही ठरू शकतो.
डस्ट माइट्सचा धोका वाढतो
या अभ्यासात सहभागी संशोधक रोजाली मेनन या सांगतात की, लोकांना घरात कपडे वाळवल्याने हवेत किती ओलावा वाढतो, याची कल्पनाच नसते. अभ्यासात असेही आढळले की ७५% घरांमध्ये ओलाव्याची लेव्हल इतकी जास्त होती की त्यामुळे डस्ट माइट्स वाढू शकतात, जे अॅलर्जी आणि श्वसनाच्या समस्यांना कारणीभूत ठरतात.
बुरशी आणि बॅक्टेरियांचा धोका
संशोधनात घरात कपडे वाळवणे आणि बुरशीचा थेट संबंध आढळून आला. एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीचा बीजाणू आढळला, जो कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये फुफ्फुसांचा संसर्ग करू शकतो. सुमारे २५% घरांमध्ये हा धोका दिसून आला.
Web Summary : Drying clothes inside increases humidity, fostering mold and dust mites. This worsens allergies, asthma, and respiratory issues. Poor ventilation exacerbates the problem, posing health risks, especially for vulnerable individuals.
Web Summary : घर के अंदर कपड़े सुखाने से नमी बढ़ती है, जिससे फफूंद और धूल के कण पनपते हैं। इससे एलर्जी, अस्थमा और सांस की समस्याएं बढ़ जाती हैं। खराब वेंटिलेशन समस्या को और बढ़ा देता है, जिससे स्वास्थ्य जोखिम पैदा होते हैं, खासकर कमजोर लोगों के लिए।