Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चहा प्यायल्यानं कोणता आजार होतो? चहा पिण्याच्या पद्धतीत 'हा' बदल करा, त्रास होणार नाही

चहा प्यायल्यानं कोणता आजार होतो? चहा पिण्याच्या पद्धतीत 'हा' बदल करा, त्रास होणार नाही

Side Effects Of Drinking Tea : अति प्रमाणात चहा प्यायल्यानं कोणते आजार होऊ शकतात ते समजून घ्या.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:41 IST2026-01-05T12:27:30+5:302026-01-05T12:41:49+5:30

Side Effects Of Drinking Tea : अति प्रमाणात चहा प्यायल्यानं कोणते आजार होऊ शकतात ते समजून घ्या.

Side Effects Of Drinking Tea : Drinking Tea Side Effects 5 Side effects Of Drinking Tea | चहा प्यायल्यानं कोणता आजार होतो? चहा पिण्याच्या पद्धतीत 'हा' बदल करा, त्रास होणार नाही

चहा प्यायल्यानं कोणता आजार होतो? चहा पिण्याच्या पद्धतीत 'हा' बदल करा, त्रास होणार नाही

भारतातील बऱ्याच लोकांची सकाळची सुरूवात चहा पिऊन होते. चहा फक्त एक पेय नाही तर संस्कृती आणि जीवनशैलीचा एक भाग आहे. पण तुम्ही कधी विचार केलाय का, जास्त प्रमाणात चहा प्यायल्यानं शरीराचं नुकसान होऊ शकतं आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये तब्येतीशी संबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. 
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तब्येतीवर गंभीर परिणाम होतो. अति प्रमाणात चहा प्यायल्यानं कोणते आजार होऊ शकतात ते समजून घ्या. (Side Effects Of Drinking Tea)

रिसर्च आणि हेल्थ डेटानुसार चहाचे अति सेवन आणि त्यातील पदार्थ शरीराच्या अवयवांवर गंभीर परिणाम करतात. खासकरून यात मिसळली जाणारी साखर, कॅफेन तब्येतीसाठी जोखिम निर्माण करणारे ठरू शकते. चहा आणि त्यामुळे होणारं नुकसान होण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया.

चहा प्यायल्यानं  डायबिटीसचा धोका वाढतो का?

चहा आणि साखरेचा घनिष्ट संबंध आहे. चहा पिणं तुमच्यासाठी नुकसानकारक नसतं पण तुम्ही ज्या पद्धतीनं चहा पिता ते तुमच्यासाठी जहर ठरू शकतं. भारतात दूध आणि साखरेचा चहा मोठ्या प्रमाणात प्यायला जातो. ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हलवर परिणाम होतो.

वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहिल्यास लक्षात येते की चहातील कॅफिन आणि प्रोसेस्ड शुगरमुळे शरीरातील इंसुलिन रेजिस्टंट बिघडतो. जर तुम्ही ४ ते ५ दिवस कमी गोड चहा प्यायला तर शरीरातील कॅलरीज आणि ग्लुकोजचे प्रमाण अचानक वाढते. ज्यामुळे टाईप २ डायबिटीस होण्याचा धोका वाढतो.

केस खूपच गळताहेत-भांग विरळ दिसतो? 'हे' घरगुती ड्रिंक प्या, मुळापासून घनदाट होतील केस

या व्यतिरिक्त रिकाम्यापोटी चहा प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म स्लो होतो. ज्यामुळे पचनक्रिया खराब होते  याशिवाय स्वादुपिंडावरही दबाव पडतो जे इंन्सुलिन तयार करण्यास मदत करते. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास डायबिटीसचा धोका वाढतो.

जर तुम्ही चहाचे शौकीन असाल आणि आजारांपासून बचाव करायचा असेल तर लाईफस्टाईलमध्ये काही बदल करायला हवेत. सगळ्यात आधी साखर आहारातून पूर्णपणे वगळायला हवी किंवा कमी प्रमाणात साखर घाला. बिना साखरेचा चहा किंवा हर्बल टीसुद्धा तुम्ही पिऊ शकता.

डॉक्टर सांगतात ५ गोष्टी करा आणि १०० वर्षे जगा, ते ही भरपूर आनंदात आणि निरोगी

रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय सोडून तुम्ही रिकाम्यापोटी गरम पाणी प्या आणि काहीवेळानंतर चहा प्या. चहासोबत बिस्कीट, नमकिन खाणं टाळा. कारण यामुळे कॅलरीज आणि कार्ब्स वाढतात. दिवसभरातून कमीत कमी १ किंवा २ वेळाच चहा प्या. दुधाचा चहा पिण्याऐवजी ग्रीन टि किंवा लेमन टी प्या. ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होईल आणि वजनही कमी होईल.

Web Title : चाय पीने से: कौन सी बीमारियाँ? समस्याओं से बचने के लिए इस आदत को बदलें।

Web Summary : अत्यधिक चाय का सेवन, विशेषकर चीनी और दूध के साथ, इंसुलिन प्रतिरोध को प्रभावित करके मधुमेह के खतरे को बढ़ा सकता है। खाली पेट चाय पीने से बचें, चीनी कम करें और सेवन सीमित करें। बेहतर स्वास्थ्य के लिए ग्रीन या लेमन टी चुनें।

Web Title : Drinking tea: What diseases? Change this habit to avoid problems.

Web Summary : Excessive tea consumption, especially with sugar and milk, can increase diabetes risk by affecting insulin resistance. Avoid empty stomach tea, reduce sugar, and limit intake. Opt for green or lemon tea for better health.