आजकाल लोक आपल्या आरोग्याबाबत बरेच अलर्ट असतात. खासकरून ज्यांचे वजन जास्त असते ते लोक वजन लवकर कमी करण्यासाठी उपाय शोधतात. वॉकिंग करणं हा वजन कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहे. क्विक वेट लॉससाठी फॅड डाएट हा चांगला पर्याय असू शकतो. इतकंच नाही तर तुम्ही आरोग्याच्या प्रत्येक पैलूत सुधारणा करू शकता. वर्षांनुवर्ष करण्यात आलेल्या रिसर्चनुसार रोज वॉक केल्यानं शारिरिक आणि मानसिक असे दोन्ही फायदे मिळतात. (Walking For Weight Loss Health Benefits)
जर तुम्ही रोज १० हजार पाऊल चाललात तर कॅलरीज बर्न होण्यास मदत होईल आणि कॅलरी डिफिसिट तयार होईल. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होईल. याशिवाय संतुलित आहार घेणंही गरजेचं आहे. ज्यामुळे चांगला रिजल्ट मिळतो. एका नवीन रिसर्चनुसार छोटे मायक्रो वॉक जे फक्त १० सेकंदांचे असतात जे तब्येतीसाठी लाभदायक ठरतात.
या रिसर्चमध्ये हे दिसून आलं की जेव्हा लोक १० ते ३० सेकंदं छोटे छोटे ब्रेक घेतात आणि एनर्जीचा वापर करतात तेव्हा अधिकाधिक कॅलरीज बर्न होतात. अलिकडेच रिसर्चमधून दावा करण्यात आला आहे की मायक्रो वॉक्स दीर्घकाळ चालण्यापेक्षा जास्त प्रभावी ठरू शकतात.
जे लोक आपल्या गरजेनुसार वॉक करतात आणि वजन कमी करू पाहतात ते सकाळी रिकाम्या पोटी वॉक करतात. जे लोक डायजेशन आणि ब्लड शुगरच्या त्रासाने ग्रासलेले आहेत जे जेवणानंतर चालणं पसंत करतात. १० मिनिटं आणि ३० मिनिटांचं वॉक सुद्धा काम करणाऱ्या लोकांसाठी उत्तम ठरतं.
एनएचएसनं वयस्कर लोकांसाठी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिटं मीडियम स्पीड फिजिकल एक्टिव्हिटीज किंवा ७५ मिनिटांचा हाय स्पीड वॉक करण्याचा सल्ला दिला आहे. मायक्रो वॉक खूपच फायदेशीर ठरतो. जेव्हा आपण कमी वेळेसाठी वॉक करतो तेव्हा जास्त एनर्जी लागते आणि जास्त ऑक्सिजन घेतो.
जामा न्युरोलॉजी आणि जामा इंटरनल मेडिसनच्या रिसर्चनुसार ३० मिनिटं चालल्यानं हृदय रोग, कॅन्सर आणि वेळेआधीच मृत्यू होण्याचा धोका १० टक्क्यांनी कमी होतो. याव्यतिरिक्त मानसिक आरोग्यही चांगले राहते. जे लोक ७५ मिनिटं चालतात त्यांच्यात डिप्रेशनचा धोका १८ टक्के कमी होतो.
रिकाम्यापोटी चालण्याचे फायदे
काही अभ्यासांमध्ये दिसून येतं की रिकाम्या पोटी चालल्यानं फॅट ऑक्सिडीकरण वाढतं. ज्यामुळे जास्त फॅट जळतं. सकाळी सगळ्यात आधी वॉक केल्यानं मेटाबॉलिझ्म बुस्ट होतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. रिकाम्या पोटी चालल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात.
सकाळी रिकाम्यापोटी चालल्यानं मेटाबॉलिझ्म वेगानं होतो. शरीर उर्जेचा वापर योग्य पद्धतीनं करते. रिकाम्या पोटी चालल्यानं दिवसभर एनर्जीच्या स्तरात सुधारणा होते. थकवा येत नाही. रिकाम्या पोटी चालल्यानं अधिक फॅट बर्न होतात. पोटाची चरबी कमी होते. याव्यतिरिक्त सुर्याच्या प्रकाशात चालल्यानं व्हिटामीन डी मिळते जे हाडं आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
जेवणानंतर चालण्याचे फायदे
जेवणानंतर चालल्यानं पचनक्रिया चांगली राहते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. जेवल्यानंतर चालल्यानं इंसुलिन संवेदनशीलता वाढते. ज्यामुळे ब्लड शुगरचा स्तर कंट्रोलमध्ये राहतो. जेवणानंतर चालल्यानं सूज, एसिडीटी कमी होते. याव्यतिरिक्त पोटातील गॅस बाहेर पडतो. ब्लोटींगची समस्या उद्भवत नाही.