Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > लाल गाजर खावेत की नारंगी? कोणते गाजर चांगले-कोणते गाजर खाल्ल्यानं जास्त फायदे मिळतात

लाल गाजर खावेत की नारंगी? कोणते गाजर चांगले-कोणते गाजर खाल्ल्यानं जास्त फायदे मिळतात

निसर्गानं या दोन्ही भाज्यांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे भरलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाची निवड करण्यापेक्षा ऋतूप्रमाणे उपलब्ध असलेली दोन्ही प्रकारची गाजरं आहारात समाविष्ट करणं उत्तम ठरतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:52 IST2025-12-30T19:43:19+5:302025-12-30T19:52:42+5:30

निसर्गानं या दोन्ही भाज्यांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे भरलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाची निवड करण्यापेक्षा ऋतूप्रमाणे उपलब्ध असलेली दोन्ही प्रकारची गाजरं आहारात समाविष्ट करणं उत्तम ठरतं

Should you eat red carrots or orange ones Which carrots are better for your health | लाल गाजर खावेत की नारंगी? कोणते गाजर चांगले-कोणते गाजर खाल्ल्यानं जास्त फायदे मिळतात

लाल गाजर खावेत की नारंगी? कोणते गाजर चांगले-कोणते गाजर खाल्ल्यानं जास्त फायदे मिळतात

हिवाळ्याच्या (Winter)सुरूवातीलाच बाजारात लाल किंवा नारंगी गाजर दिसायला सुरूवात होते. गाजर फक्त चवीला उत्तम नसून तब्येतीच्या दृष्टीनंही चांगले असतात. पण अनेकदा कोणते गाजर खावेत, कोणते गाजर चांगले याबाबत लोक संभ्रमात असतात. दोन्ही प्रकारच्या गाजरांचे स्वत:चे वेगवेगळे गुणधर्म आणि पोषक तत्व असतात ज्यामुळे ती आहारात महत्वाची ठरतात. (Red carrots or orange ones Which carrots are better)

 लाल गाजर

 चव आणि पोषकतेच्या दृष्टीनं पाहिल्यात लाल गाजरं प्रामुख्यानं भारत आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. या गाजरांचा लाल रंग हा त्यातील लायकोपीन या घटकामुळे असतो. लायकोपीन हे एक  शक्तीशाली एंटी ऑक्सिडेंट आहे जे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी आणि कॅन्सरसारख्या आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. लाल गाजरं चवीला अधिक गोड आणि रसाळ असतात. त्यामुळेच ती हलवा, कोथिंबीर किंवा ज्यूस करण्यासाठी सर्वाधिक वापरली जातात.

नारंगी गाजरं

नारंगी  गाजरं ही वर्षभर उपलब्ध असतात. या गाजरांमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण ही गाजरं खातो तेव्हा आपले शरीर बीटा कॅरोटीनचे रुपांतर व्हिटामीन ए मध्ये करते हे जीवनसत्त्व डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. नारंगी गाजरं चवीला थोडी कमी गोड असतात. पण ती सॅलेडमध्ये किंवा कच्ची खाण्यासाठी उत्तम मानली जातात.

आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर दोन्ही गाजरं उत्कृष्ट ठरतात. जर तुम्हाला हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर लाल गाजरांना पसंती द्यावी. तर डोळ्याचे आरोग्य किंवा व्हिटॅमिन ए ची कमतरता भरून काढायची असेल तर नारंगी गाजरं खाणं फायदेशीर ठरतं. 

निसर्गानं या दोन्ही भाज्यांमध्ये वेगवेगळी जीवनसत्वे भरलेली आहेत. त्यामुळे कोणत्याही एकाची निवड करण्यापेक्षा ऋतूप्रमाणे उपलब्ध असलेली दोन्ही प्रकारची गाजरं आहारात समाविष्ट करणं उत्तम ठरतं. थंडीच्या दिवसांत लाल गाजरांचा आनंद घ्या. इतर ऋतूंमध्ये नारंगी गाजरांचा वापर करून स्वत:ला निरोगी ठेवा. गाजराची कोशिंबीर, गाजराचा हलवा या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. 

Web Title : लाल बनाम नारंगी गाजर: कौन सा स्वस्थ और अधिक फायदेमंद है?

Web Summary : लाइकोपीन से भरपूर लाल गाजर हृदय के लिए फायदेमंद है। बीटा-कैरोटीन वाले नारंगी गाजर दृष्टि और प्रतिरक्षा को बढ़ावा देते हैं। सलाद और मिठाई में इनका आनंद लेते हुए, बेहतर स्वास्थ्य के लिए दोनों को मौसम के अनुसार शामिल करें।

Web Title : Red vs. Orange Carrots: Which is healthier and more beneficial?

Web Summary : Red carrots, rich in lycopene, benefit heart health. Orange carrots, with beta-carotene, boost vision and immunity. Include both seasonally for optimal health benefits, enjoying them in salads and desserts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.