जेवल्यानंतर पाणी पिणं आपल्या रोजच्या जीवनशैलीचा एक भाग आहे. बरेच लोक जेवता जेवताच १ ग्लास पाणी पितात जेणेकरून खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होईल. आयुर्वेद आणि न्युट्रिशनिस्ट एक्सपर्ट्स सांगतात की जेवल्यानंतर त्वरीत पाणी प्यायल्यानं पचनक्रियेवर परिणाम होतो (Right Time To Drink Water). दीर्घकाळ अशी सवय कायम ठेवल्यास मोठ्या समस्याही उद्भवू शकतात. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं कोणत्या समस्या उद्भवतात समजून घेऊ. (Should you drink water after meals or before meals)
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं काय तोटे होतात?
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पाचक रस पातळ होतो ज्यामुळे अन्न पचायला त्रास होतो. हळू हळू पचनक्रिया कमकुवत होऊ लागते.
जर तुम्ही खाल्ल्यानंतर पाणी पित असाल तर गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या उद्भवू शकते. पाणी जेवणासोबत प्यायल्यानं फर्मेंटेशन वाढते. ज्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं मेटाबॉलिझ्म मंद होतो. ज्यामुळे शरीराच्या कॅलरीज योग्य पद्धतीन बर्न होत नाहीत आणि फॅट जमा होऊ लागते. या कारणामुळे हळूहळू वजन वाढतं.
ज्या लोकांना हॉर्ट बर्नची समस्या आहे त्यांच्यासाठी जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं नुकसानकारक ठरू शकतं. ज्यामुळे छातीत जळजळ होणं, एसिडिटी, आंबट ढेकर येणं अशा समस्या उद्भवतात.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं शरीरातील पोषक तत्व व्यवस्थित शोषून घेतली जात नाहीत. खासकरून प्रोटीन्स, मिनरल्सचे अवशोषण व्यवस्थित होत नाही.
जर तुम्हाला तहान लागली असेल तर जेवणाच्या ३० मिनिटं आधी किंवा कमीत कमी ३० ते ४५ मिनिटांनी पाणी प्या. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. शरीराचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
पाणी पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
सकाळी उठल्यावर १ ते २ ग्लास कोमट पाणी पिणं अत्यंत महत्वाचे असते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनक्रिया चांगली राहते.
जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुलभ होते आणि भूकही मर्यादित राहते. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
जेवताना खूप पाणी पिऊ नये. जर घसा कोरडा पडत असेल तर फक्त १ ते २ घोट पाणी प्यावे.
जेवणानंतर लगेच पाणी पिणं टाळावं. कारण यामुळे पचनशक्ती मंदावते. साधारणपणे पाऊण ते एक तासानंतर पाणी पिणं उत्तम मानलं जातं.
शरीरातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी व्यायामाच्या थोडा वेळ आधी आणि व्यायाम झाल्यानंतर पाणी प्यावं.
