Join us

कानातील मळ काढण्यासाठी इअरबड्स वापरता? तज्ज्ञ सांगतात, कायमचं बहिरं व्हायचं असेल तर..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:49 IST

Ear Care Tips : नेहमीच कानातील मळ काढण्यासाठी इअरबड्सचा वापर केल्यानं कानाचं नुकसान होऊ शकतं. अनेक एक्सपर्टही अनेकदा हाच सल्ला देतात की, कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरू नका.  

Ear Care Tips :  सामान्यपणे कानात जमा झालेला मळ काढण्यासाठी जास्तीत जास्त लोक इअरबड्स किंवा कॉटन स्वॅब्सचा वापर करतात. सगळ्यांनाच असं वाटतं की, कानात जमा झालेला मळ काढणं गरजेचं असतं. पण हे सत्य नाहीये. नेहमीच कानातील मळ काढण्यासाठी इअरबड्सचा वापर केल्यानं कानाचं नुकसान होऊ शकतं. अनेक एक्सपर्टही अनेकदा हाच सल्ला देतात की, कान साफ करण्यासाठी इअरबड्स वापरू नका.  

अशात दिल्लीतील डॉ. मीना अग्रवाल यांनी Indiatv.in ला याबाबत माहिती दिली. त्यांनी कान साफ करण्यासाठी इअरबड्सचा वापर का करू नये याची कारणं सांगितली आहेत.

डॉक्टर सांगतात की, इअरवॅक्स म्हणजे कानातील मळ म्हणजे काही घाण नाही. ही शरीरात होणारी एक नॅचरल प्रक्रिया आहे. हा मळ एकप्रकारे कानासाठी सुरक्षा कवचासारखा काम करतो. या मळानं कानात कीटक, धूळ आणि इतर नुकसानकारक गोष्टी रोखल्या जातात. कानातील मळामध्ये अॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात, जे कानाचा इन्फेक्शनपासून बचाव करतात.

आणखी आत जातो मळ

जेव्हा तुम्ही इअरबड्सनं कान साफ करण्याचा प्रयत्न करत असता, तेव्हा जास्तीत जास्त केसेसमध्ये मळ बाहेर येण्याऐवजी आणखी आत ढकलला जातो. ज्यामुळे कानाच्या आतील मार्ग बंद होऊ शकतो आणि यामुळे तुम्हाला ऐकू येण्यात समस्या होऊ शकते.

कानाच्या पडद्याचं होऊ शकतं नुकसान

इअरबड्स पुन्हा पुन्हा कानात टाकल्यानं, आत खोलवर टाकल्यानं कानाच्या पडद्याचं नुकसान होऊ शकतं. कधी कानाचा पडदा फाटूही शकतो. यानं वेदना, सूज किंवा ऐकण्याची क्षमताही कमी होऊ शकते.

इन्फेक्शनचा धोका

पुन्हा पुन्हा वापरलेल्या किंवा धूळ-माती लागलेल्या इअरबड्सचा वापर केल्यानं कानात नुकसानकारक बॅक्टेरिया जाऊ शकता. ज्यामुळे फंगल किंवा बॅक्टेरिअल इन्फेक्शन होऊ शकतं.

कशी कराल कानाची स्वच्छता?

कानाची नेहमीच वेगळी काही स्वच्छता करण्याची गरज नसते. कानाची रचना अशी आहे की, कान स्वत:  इअरवॅक्स बाहेर काढतात. जर जास्त मळ जमा झाला असेल, कमी ऐकायला येत असेल तर कानाच्या डॉक्टरांना भेटा. त्यांच्या सल्ल्यानंच कान साफ करा. डॉक्टर यासाठी तुम्ही एखादा ईअरड्रॉप देऊ शकतात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स