आजकाल कमी कष्ट किंवा शारीरिक हालचालींमुळे कमी वयातच आरोग्य बिघडत आहे. तरुणांनाही अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. मोठ्या इमारतींमध्ये राहणारे लोक लिफ्ट वापरतात. फक्त दोन-चार पायऱ्या चढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडते. पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणं सामान्य आहे कारण हृदयाला जास्त काम करावं लागतं. परंतु जर थोड्याच पायऱ्या चढल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा दम लागत असेल तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे कारण ही काही आजाराची लक्षणं देखील असू शकतात.
डॉक्टर म्हणतात की, तुम्ही निरोगी असलात तरी, पायऱ्या चढताना दम लागणं, श्वास घेण्यास त्रास होणं म्हणजे तुम्ही व्यायाम करत नाही आहात किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय नाही. जर तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस खुर्चीवर बसून घालवला आणि जेवणानंतर झोपायला गेलात तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होतो आणि श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD)
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजमुळे पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ही समस्या प्रामुख्याने धूम्रपान, तंबाखूचा धूर आणि वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्यामुळे उद्भवते. यामुळे फुफ्फुसांचं नुकसान होतं.
हृदयरोग
डॉक्टर म्हणतात की जर तुम्हाला दोन किंवा चार पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते देखील हृदयरोगाचं लक्षण असू शकतं. अशा स्थितीत छातीत दुखत आहे की नाही हे तपासण्यासाठी लिपिड प्रोफाइलचा वापर केला जातो.
अस्थमा
पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होणं हे देखील अस्थमाचं एक कारण असू शकतं. या आजारात फुफ्फुसाशी संबंधित समस्या उद्भवतात. याच्याशी संबंधित अनेक गंभीर समस्या देखील उद्भवू लागतात. अस्थमाच्या रुग्णांनी हळूहळू पायऱ्या चढाव्यात.
लठ्ठपणा
लठ्ठपणामुळे पायऱ्या चढताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. शरीराचं जास्त वजन फुफ्फुसांवर परिणाम करतं आणि श्वास घेणं अवघड होतं. अशा परिस्थितीत वजन नियंत्रित करण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. लठ्ठपणा कमी केला पाहिजे.