Join us

shefali jariwala death : कमी रक्तदाबाचा त्रास, शिळा आहार की चुकीचे उपचार- शेफाली जरीवालाच्या अकाली निधनाचं कारण काय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 16:55 IST

low BP death news Shefali Jariwala: anti-aging injection side effects: what not to eat in low blood pressure: कमी खाणं, न खाणं, कमी पाणी पिणं, डिहायड्रेशन, कमी रक्तदाब, यासाऱ्याचा परिणामही तब्येतीवर होऊ शकतो, असं तज्ज्ञ सांगतात.

'काटा लगा' गर्ल आणि 'बिग बॉस १३' मुळे प्रसिद्ध झोतात आलेली शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(Shefali Jariwala Death) यापूर्वी देखील कमी वयात अनेक बॉलिवूडमधील कलाकारांना हार्ट ॲटॅकमुळे जीव गमवावा लागला. परंतु, पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार तिच्या मृत्यूचे कारण थोडे वेगळे सांगण्यात येते आहे. (food to avoid in hypotension) विविध वृत्तांनुसार (anti-aging injection side effects) शेफाली सुंदर आणि कायम तरुण दिसण्यासाठी ॲण्टी एजिंग उपचार घेत होती. ज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे व्हिटॅमिन सी आणि ग्लूटाथियोनचे असते असं डॉक्टरांनी सांगितलं. ज्यामुळे आपली त्वचा कायम गोरी, सुंदर राहते आणि शरीर डिटॉक्सीफिकेशन करण्यास मदत करते. पण त्यामुळे मृत्यू ओढावू शकतो का?

कार्डियाक ॲटॅक येण्यापूर्वी शरीरात दिसतात ५ लक्षणं, डॉक्टर सांगतात अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून...

शेफाली ॲण्टी एजिंग उपाचारांसाठी वेळोवेळी इंजेक्शन घेत होती. पण डॉक्टरांचं असं मत आहे की या औषधांचा परिणाम चुकीचा झाला आणि अचानक रक्तदाब कमी झाला त्यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या घरी सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यासाठी तिने उपवास केला होता.  शिळा भातही खाल्ला होता असं विविध वृत्त सांगतात.

इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्पाइनचे कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट डॉ. राहुल चावला यांच्या मते आयव्ही ग्लुटाथिओन आणि आयव्ही डिटॉक्सिफायिंग ड्रिप हे इंजेक्शन शरीरासाठी हानिकारक असतात. याच्या दुष्परिणामामुळे हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. यामध्ये एरिथमिया आणि हायपोटेन्शन यांचा समावेश असतो. यामुळे शरीरातील रक्तदाबाची पातळी कमी - जास्त होते. 

काही अन्नपदार्थ कमी रक्तदाब असलेल्या लोकांसाठी हानिकारक ठरतात, ज्यामुळे ते खाणे टाळायला हवे. डिहायड्रेशन हे कमी रक्तदाबाचे सगळ्यात मोठे कारण आहे. अल्कोहोलचे अतिप्रमाणात सेवन करणे टाळायला हवे. दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. पण फक्त दूध पिऊनही अशक्तपणा आणि थकवा येतो. म्हणून दूध आणि इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतर घेऊ नयेत. तसेच मीठाचे प्रमाण आहारात पुरेसे असायला हवे. फ्रोजन पदार्थ उदा. मीठ लावलेले काजू, बिया, हिरवे वाटाणे आणि बीन्स इत्यादी पदार्थ खाणं टाळणंच योग्य.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्ससेलिब्रिटीबॉलिवूडहृदयविकाराचा झटका