Join us

चुकूनही उपाशीपोटी घेऊ नका औषधं किंवा इंजेक्शन, वाचा काय होऊ शकतो धोका; सावध व्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 10:20 IST

Shefali Jariwala Death: शेफालीचं वय ४२ होतं आणि तिचा जीव कार्डियाक अरेस्टमुळे गेला. शेफालीच्या मृत्यूच्या इतरही कारणांची चर्चा त्यानंतर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शेफालीनं उपाशीपोटी काही औषधं घेतली होती.

Shefali Jariwala Death: अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या अचानक झालेल्या निधनानं सगळ्यांनाच धक्का बसलाय. शेफालीचं वय ४२ होतं आणि तिचा जीव कार्डियाक अरेस्टमुळे गेला. शेफालीच्या (Shefali Jariwala) मृत्यूच्या इतरही कारणांची चर्चा त्यानंतर होत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, शेफालीनं उपाशीपोटी काही औषधं घेतली होती. मीडिया रिपोर्टनुसार, गेल्या शुक्रवारी शेफालीनं उपवास केला होता. त्यासोबतच उपाशीपोटी काही औषधं घेतली होती. ज्यामुळे तिचं ब्लड प्रेशर कमी झालं आणि कार्डियाक अरेस्टमुळे तिचा जीव गेला. यावर एक्सपर्ट काय सांगतात हे पाहुया.

उपाशीपोटी औषधांबाबत एक्सपर्ट काय सांगतात?

ग्लोबल होलिस्टिक हेल्थ गुरु आणि स्पिरिच्युअल लाइफ कोच डॉक्टर मिक्की मेहता यांनी NDTV सोबत बोलताना सांगितलं की, 'बरेच लोक असे असतात जे सकाळी उपाशीपोटी काही औषधं घेतात किंवा उपाशीपोटी इंजेक्शनही घेतात. ही बाब सामान्य वाटत असली तरी आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्ही गोष्टी टाळण्याचा सल्ला देतात'.

आयुर्वेद काय सांगतं?

डॉक्टर मिक्की सांगतात की, आयुर्वेदानुसार सकाळी शरीराची अग्नि म्हणजे पचनशक्ती स्लो झालेली असते. यावेळी काहीही न खाता जर औषधं घेतली किंवा इंजेक्शन घेतलं तर शरीरात वात दोष वाढू शकतो. ज्यामुळे गॅस, तोंड कोरडं पडणे, अस्वस्थ वाटणे, चक्कर येणे आणि मळमळ होणे अशा समस्या होऊ शकतात.

सायन्स काय सांगतं?

मॉडर्न मेडिकल रिसर्चबाबत सांगताना डॉक्टर म्हणाले की, अनेक औषधं जसे की, पेनकिलकर, अ‍ॅंटी-बायोटिक आणि सूज कमी करणारी औषधं उपाशीपोटी घेतल्यास पोटातील थराचं नुकसान होतं. ज्यामुळे अ‍ॅसिडिटी किंवा गॅस्ट्रायटिस, मळमळ किंवा उलटी, पोटाचा अल्सर अशा समस्या होऊ शकतात.

त्याप्रमाणे काही इंजेक्शन जसे की, व्हिटामिन किंवा वॅक्सीन उपाशीपोटी घेतली तर ब्लड शुगर लेव्हल कमी होते, ज्यामुळे चक्कर येऊ शकते किंवा बेशुद्धही पडू शकता. काहीतरी खाऊन औषध घेतल्यानं साइड इफेक्ट्स बरेच कमी होतात.

उपाशीपोटी कधी घेतली जातात औषधं?

काही औषधं जसे की, थायरॉइडच्या गोळ्या किंवा काही अ‍ॅंटीबायोटिक डॉक्टर उपाशीपोटी घेण्याचा सल्ला देतात. ही औषधं तेव्हा काम करतात जेव्हा पोटात काहीच नसेल. पण डॉक्टरांनी सांगितलं असेल तरच असं करावं. सल्ल्याशिवाय औषध घेणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.

टॅग्स : आरोग्यशेफाली जरीवालाहेल्थ टिप्स