Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

Shah Rukh Khan Dehydrated, Suffers Heat Stroke : उष्माघात म्हणजे काय? उष्माघात टाळायचा कसा, जीवाला धोका - सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2024 11:06 AM2024-05-23T11:06:58+5:302024-05-23T11:48:57+5:30

Shah Rukh Khan Dehydrated, Suffers Heat Stroke : उष्माघात म्हणजे काय? उष्माघात टाळायचा कसा, जीवाला धोका - सांभाळा

Shah Rukh Khan Dehydrated, Suffers Heat Stroke | उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

उष्माघाताचा कहर, शाहरुख खानला आली भोवळ! सनस्ट्रोकचा धोका टाळायचे पाहा उपाय - नाहीतर व्हावे लागेल ऍडमिट

उन्हाचा तडाखा (Heat Stroke) सर्वांनाच बसत आहे. सामान्य, नेते आणि आता सेलिब्रिटीही उष्माघातामुळे भोवळ येऊन पडत आहे. उष्माघातामुळे बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shahrukh Khan) प्रकृती खालावली असून, त्याला उपचारासाठी अहमदाबादमधील के. डी. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादवर मात करत यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी शाहरुख मैदानात हजर होता. सामना जिंकल्यावर केकेआरच्या चाहत्यांसह शाहरुखनेही विजयी जल्लोष केला. मात्र, याचदरम्यान शाहरुखची तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. डिहायड्रेशनमुळे (Dehydration) त्याची प्रकृती खालावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. दरम्यान, उष्माघात म्हणजे काय? सनस्ट्रोकचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून कोणती खबरदारी घ्यावी? पाहूयात(Shah Rukh Khan Dehydrated, Suffers Heat Stroke).

सर्वात आधी उष्माघात म्हणजे काय, हे पाहू..

सतत कडक उन्हात काम केल्यानंतर किंवा चालल्यानंतर उष्मापात होतो. यालाच उष्माघात किंवा सनस्ट्रोक म्हटले जाते. शरीर जेव्हा जास्त उष्माघात शोषून घेतं, तेव्हा हायपरथर्मिया म्हणजेच अतिउच्च तापमानाची शारीरिक स्थिती निर्माण होते. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात वाढत असलेल्या तापमानामुळे उष्माघाताचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे उष्माघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं.

हळद दूधात घालून प्यावी की पाण्यात? पाहा, कशाने शरीराला मिळते दुप्पट ताकद

उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा?

- उष्माघातापासून बचाव करण्यासाठी, दुपारी १२ ते ३ च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे.

- अति उष्मा आणि उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्कार्फ, कॅप, हॅट आणि छत्री वापरा. आपले डोके नेहमी झाकून ठेवा. बाहेर पडण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घ्या.

- डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चष्मा किंवा काळा चष्मा घालायला विसरू नका.

- उष्माघात टाळण्यासाठी लिंबू पाणी, नारळ पाणी, बेल फळाचे सरबत, कोकम सरबत यांसारख्या नैसर्गिक पेयांचे सेवन करत राहा. यामुळे इलेक्ट्रोलाइटची पातळी राखण्यात मदत होते.

- आपल्या आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

- याशिवाय चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिणे टाळा. त्यामुळे शरीराला डिहायड्रेशनचा धोका राहतो.

पायांच्या तळव्यांची जळजळ होते? ५ घरगुती उपाय - पायांची आग होईल बंद लवकर

- उन्हाळ्यात सतत काम केल्यामुळे किंवा लहान मुले खेळल्यामुळे त्यांचा थकवा वाढू लागतो. अशावेळी शरीराला काही वेळ विश्रांती द्या.

- उन्हाळ्यात हलक्या रंगाचे, सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला.

- नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीच्या २०२३ च्या सल्ल्यानुसार, लोकांनी पडदे किंवा शेड्स वापरून घरे थंड ठेवण्याचा प्रयत्न करावा. दिवसातून दोनदा आंघोळ करावी, जेणेकरून शरीराचे तापमान कमी ठेवण्यास मदत होईल.

Web Title: Shah Rukh Khan Dehydrated, Suffers Heat Stroke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.