Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सर जो तेरा चकराये.. चमचाभर तिळाच्या तेलापुढे महागडे तेल फेल, अंगदुखी-स्ट्रेसवर जबरदस्त पारंपरिक उपाय

सर जो तेरा चकराये.. चमचाभर तिळाच्या तेलापुढे महागडे तेल फेल, अंगदुखी-स्ट्रेसवर जबरदस्त पारंपरिक उपाय

Sesame Oil for Headache, Body Pain & Stress Relief, Traditional Ayurvedic Solution : तिळाचे तेल आरोग्यासाठी फार चांगले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2026 18:21 IST2026-03-04T18:17:52+5:302026-03-04T18:21:49+5:30

Sesame Oil for Headache, Body Pain & Stress Relief, Traditional Ayurvedic Solution : तिळाचे तेल आरोग्यासाठी फार चांगले.

Sesame Oil for Headache, Body Pain & Stress Relief, Traditional Ayurvedic Solution | सर जो तेरा चकराये.. चमचाभर तिळाच्या तेलापुढे महागडे तेल फेल, अंगदुखी-स्ट्रेसवर जबरदस्त पारंपरिक उपाय

सर जो तेरा चकराये.. चमचाभर तिळाच्या तेलापुढे महागडे तेल फेल, अंगदुखी-स्ट्रेसवर जबरदस्त पारंपरिक उपाय

भारतीय स्वयंपाकघरात तीळाचे तेल अनेक वर्षांपासून वापरले जाते. केवळ स्वयंपाकासाठीच नव्हे, तर आरोग्य आणि सौंदर्य यासाठीही तिळाचे तेल अत्यंत गुणकारी मानले जाते. आयुर्वेदातही तिळाच्या तेलाला विशेष महत्त्व दिले गेले आहे. शरीराला पोषण देणे, त्वचा मऊ ठेवणे आणि केसांची निगा राखणे अशा अनेक कारणांसाठी तिळाचे तेल उपयुक्त ठरते.

तिळाच्या तेलात अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटामिन ई, ओमेगा-६ फॅटी अ‍ॅसिड्स आणि सेसमॉल, सेसामिनसारखे नैसर्गिक घटक आढळतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास मदत करतात आणि पेशींना होणारे नुकसान टाळण्यास हातभार लावतात. (Sesame Oil for Headache, Body Pain & Stress Relief, Traditional Ayurvedic Solution)तिळाचे तेल स्वभावाने उष्ण मानले जाते, त्यामुळे थंड हवामानात किंवा सांधेदुखीच्या त्रासात ते विशेष लाभदायक ठरते. यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेचे संरक्षण करतात आणि संसर्गाचा धोका कमी करतात. अंगदुखी किंवा ताण आला असेल तर तिळाच्या तेलाने मालीश करणे फारच आरामदायी ठरते. हे तेल ताण वेदना ओढून घेते. सुखाची झोपही लागते. 

त्वचेसाठी तिळाचे तेल उत्तम मॉइश्चरायझर म्हणून काम करते. आंघोळीपूर्वी हलक्या हाताने तिळाच्या तेलाने मालीश केल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार राहते. कोरडी त्वचा, खरूज किंवा खाज यांसारख्या त्रासातही याचा उपयोग होतो. उन्हामुळे वाढलेल्या कोरडेपणावरही तिळाचे तेल लावल्यास आराम मिळू शकतो.

केसांसाठी तिळाचे तेल पोषणदायी ठरते. डोक्याला हलक्या हाताने तिळाच्या तेलाने मालीश केल्यास रक्ताभिसरण सुधारते आणि केसांची मुळे मजबूत होण्यास मदत होते. कोंडा कमी करण्यास आणि केसांना नैसर्गिक चमक देण्यासही हे तेल उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा तिळाचे तेल कोमट करून लावल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो. तिळाचे तेल वापरताना ते शुद्ध आणि कोल्ड-प्रेस्ड प्रकारचे असल्याची खात्री करावी. अति प्रमाणात सेवन केल्यास वजन वाढण्याची शक्यता असते, त्यामुळे संतुलित आहारासोबतच याचा समावेश करावा.

एकंदरीत, तिळाचे तेल हे आरोग्य आणि सौंदर्य यासाठी उपयुक्त असे बहुगुणी तेल आहे. योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापरल्यास त्वचा, केस आणि शरीराला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे रोजच्या जीवनात तिळाच्या तेलाचा समावेश केल्यास नैसर्गिक पद्धतीने आरोग्याची काळजी घेता येते.

Web Title : तिल का तेल: दर्द और तनाव से राहत के लिए रामबाण।

Web Summary : एंटीऑक्सिडेंट और फैटी एसिड से भरपूर तिल का तेल स्वास्थ्य, त्वचा और बालों के लिए फायदेमंद है। यह सूजन को कम करता है, त्वचा को मॉइस्चराइज़ करता है, बालों को मजबूत करता है और शरीर के दर्द और तनाव से राहत दिलाता है। नियमित उपयोग से समग्र कल्याण को बढ़ावा मिलता है।

Web Title : Sesame oil beats expensive oils for pain, stress relief.

Web Summary : Sesame oil, rich in antioxidants and fatty acids, is beneficial for health, skin, and hair. It reduces inflammation, moisturizes skin, strengthens hair, and relieves body pain and stress. Regular use promotes overall well-being.