विटामिन सी हे शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्त्व आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे, जखमा लवकर भरुन येणे, त्वचा निरोगी राखणे आणि शरीरातील लोह शोषण वाढवणे अशी अनेक कामे ते करते. (See which diseases are caused due to Vitamin C deficiency, skin looks dull - even applying expensive creams is a waste)मात्र आहारातून पुरेसे विटामिन सी न मिळाल्यास त्याची कमतरता निर्माण होते आणि त्याचे विविध परिणाम शरीरावर दिसू लागतात.
विटामिन सी च्या कमतरतेमुळे सर्वात आधी थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो. सतत दमल्यासारखे वाटणे, काम करण्याची इच्छा कमी होणे आणि शरीरात उत्साह न राहणे ही सुरुवातीची लक्षणे असतात. यासोबतच सर्दी, खोकला किंवा संसर्ग वारंवार होऊ लागतात, कारण रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. हिरड्यांवरही विटामिन सी च्या कमतरतेचा परिणाम दिसून येतो. दात घासताना हिरड्यांतून रक्त येणे, सूज येणे किंवा दात सैल होणे अशी लक्षणे दिसू शकतात. जखमा उशिरा भरुन येणे, लहान खरचटणेही लवकर बरे न होणे हे देखील याच कमतरतेचे संकेत असतात. सांधे दुखणे किंवा स्नायूंमध्ये वेदना जाणवणे ही लक्षणेही फार कॉमन आहेत.
त्वचेवर विटामिन सी च्या कमतरतेचा परिणाम ठळकपणे जाणवतो. त्वचा कोरडी, निस्तेज आणि रुक्ष दिसू लागते. कोलेजन निर्मिती कमी झाल्यामुळे त्वचेची लवचिकता घटते आणि लवकर सुरकुत्या पडण्याची शक्यता वाढते. चेहऱ्यावर थकवा दिसतो. कितीही ट्रिटमेंट्स केल्यातरी परिणाम होत नाही. उलट चेहरा जास्त निस्तेज होतो. प्रदूषण कारणीभूत आहे किंवा जीवनशैली कारणीभूत आहे असे आपल्याला वाटते. ते काही प्रमाणात खरेही असते. मात्र शरीरातील जीवनसत्त्व सी कमी होणे हा सगळ्यात मोठा भाग आहे. त्वचा चांगली राहण्यासाठी या जीवनसत्त्वाची पातळी नीट असणे गरजेचे आहे. त्वचेवर लहान लहान काळे डाग, पुरळ, ठिपके किंवा गडद रंगाचे डाग पडतात. केसांच्या मुळांभोवती त्वचा खरखरीत व्हायला लागते. केस गळती वाढणे हेही विटामिन सी च्या कमतरतेशी संबंधित असू शकते. एकूणच त्वचा संवेदनशील होते आणि बाह्य वातावरणाचा परिणाम लवकर होतो.
दीर्घकाळ विटामिन सी ची तीव्र कमतरता राहिल्यास ‘स्कर्व्ही’सारखा आजार होऊ शकतो, ज्यामध्ये अशक्तपणा, हिरड्यांचे गंभीर आजार आणि त्वचेत गंभीर बदल दिसून येतात. त्यामुळे आहारात आवळा, संत्री, मोसंबी, लिंबू, पेरु, टोमॅटो यांसारखी विटामिन सी समृद्ध फळे व भाज्या नियमितपणे खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.
