lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > साडी कॅन्सर हा आजार काय असतो? कॅन्सर टाळण्यासाठी साडी नेसताना ही काळजी घ्या-डॉक्टरांचा सल्ला

साडी कॅन्सर हा आजार काय असतो? कॅन्सर टाळण्यासाठी साडी नेसताना ही काळजी घ्या-डॉक्टरांचा सल्ला

Saree Cancer Indian Women : साडी कॅन्सर नावाचा आजार चर्चेत..

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 04:55 PM2024-03-27T16:55:26+5:302024-04-02T10:48:52+5:30

Saree Cancer Indian Women : साडी कॅन्सर नावाचा आजार चर्चेत..

Saree Cancer Indian Women Wearing Saree Most Of The Time Experts Openion | साडी कॅन्सर हा आजार काय असतो? कॅन्सर टाळण्यासाठी साडी नेसताना ही काळजी घ्या-डॉक्टरांचा सल्ला

साडी कॅन्सर हा आजार काय असतो? कॅन्सर टाळण्यासाठी साडी नेसताना ही काळजी घ्या-डॉक्टरांचा सल्ला

भारतात पारंपारीक पोशाख म्हणून सुरूवातीच्या काळापासून साडी नेसली जाते. अनेकजणी खास प्रसंगांना साडी नेसतात तर काहीजणी रोजच साड्या  नेसतात. साडी नेसल्यामुळे कॅन्सरचा धोकासुद्धा वाढू शकतो. तुम्हाला वाचून विश्वास बसणार नाही पण हे खरंच आहे.  फक्त साडीच नाही जे कपडे जे  घातल्यानंतर तुम्हाला त्रास जाणवत असेल तर ते कॅन्सरचं कारण ठरू शकते. (Saree Cancer Indian Women Wearing Saree Most Of The Time)

साडी नेसताना साडी व्यवस्थित खोचली जावी यासाठी परकर वापरला जातो. साडी बांधण्यासाठी सुती पेटीकोटद्वारे कमरेला सुती धागा घट्ट बांधला जातो. दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलचे कॅन्सर सर्जन डॉ. विवेक गुप्ता यांच्या मते, जर एखाद्या महिलेने जास्त वेळ साडी घातली तर ती तिच्या कंबरेला घर्षण होऊ लागते आणि त्वचा सोलून काळी पडू लागते. वारंवार त्वचा सोलली जाणं, त्वचेवर रिएक्शन येणं यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आजार उद्भवू शकतो. 

एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार हा त्वचेच्या कॅन्सरचा एक प्रकार आहे जो कंबरेच्या किनारी होतो. कंबरेभोवती कोणतेही कापड घट्ट बांधल्याने हा आजार  होऊ शकतो. ज्यामुळे खाजही येते. हे टाळण्यासाठी साडी  कंबरेभोवती घट्ट बांधू नका, घरात गाऊन किंवा कोणतेही मोकळे कपडे वापरा,  पेटीकोटची साडी जास्त घट्ट असू नये. नियमित स्वच्छता ठेवा आणि कंबरेचं व्यवस्थित निरिक्षण करा.

साडीच्या कॅन्सरमध्ये कापडापेक्षा जास्त स्वच्छता जास्त जबाबदार असते. ज्या भागात जास्त उष्णता आणि आर्द्रता असते, तिथे हा कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. बिहार आणि झारखंडमधून अजूनही त्याची प्रकरणे नोंदवली जात आहेत. भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरपैकी 1 टक्के कॅन्सरमध्ये साडीचा कॅन्सर आढळतो. वैद्यकीय भाषेत याला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (SCC) म्हणतात.

भारतातील मुंबईतील आरएन कूपर रुग्णालयातही याबाबत संशोधन करण्यात आले आहे. धोतीचाही या संशोधनात समावेश होता. सारी कॅन्सर हे नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिले आहे. जेव्हा एक केस समोर आली ज्यामध्ये 68 वर्षीय महिलेला स्तनांचा कर्करोग असल्याचे आढळून आले. 13 वर्षांच्या वयापासून ती महिला साडी नेसत होती.

काश्मिरमध्ये कांगडी कॅन्सर

कांग्री कॅन्सर काश्मीरमध्ये आढळतो. हा देखील एक प्रकारचा त्वचेचा कर्करोग आहे. हा कर्करोग फक्त काश्मीरमधून नोंदवला जातो. अत्यंत थंडीच्या दिवसांत तेथील स्त्री-पुरुष मातीच्या भांड्यात शेकोटीप्रमाणे कपड्यात आग लावून बसतात, त्यामुळे त्यांना उब मिळते, पण पोट आणि मांड्यांना मिळणारी ही सततची उष्णता कर्करोगाचे कारण बनू शकते.

पुरूषांमध्ये कॅन्सरसाठी खूप टाईट फिट जीन्स जबाबदार मानली गेली आहे. खरं तर, खूप घट्ट कपडे तासनतास घातले तर ते शरीराला हानी पोहोचवतात. त्या भागातील ऑक्सिजनचा प्रवाह विस्कळीत होऊ शकतो. संशोधनानुसार, जीन्स पुरुषांमध्ये पाठीच्या खालच्या भागात तापमान वाढवते, ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि टेस्टिक्युलर कर्करोग देखील होऊ शकतो. मात्र, या संशोधनाचे ठोस निष्कर्ष येणे बाकी आहे.

Web Title: Saree Cancer Indian Women Wearing Saree Most Of The Time Experts Openion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.