हाय ब्लड प्रेशर ज्याला हायपरटेंशन (Hypertension) असंही म्हटलं जातं. आजकाल लाईफस्टाईलशी निगडीत समस्या खूपच सामान्य झाल्या आहेत. या सायलेंट किलर आजारात रक्ताचा दबाव धमन्यांच्या भिंतींवर काहीवेळ पडतो. वेळीच नियंत्रणात ठेवले नाही तर हॉर्ट अटॅक, स्ट्रोक किंवा किडनी खराब होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. (Sadhguru Told 5 Easy Ways And Foods That Can Control High BP naturally At Home)
ब्लड प्रेशर काय आहे?
सामान्य बीपी जवळपास १२०/८० इतका असतो तर हाय बीपीमध्ये १४०/९० इतका बीपी असतो. हाय बीपीची समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. दीर्घकाळ ही समस्या नियंत्रणात न ठेवल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे हॉर्ट डिसिज, हृदय विकाराचा झटका इतर जीवघेण्या स्थिती उद्भवतात.
हाय बी.पी नियंत्रणात कसा आणावा?
ईशा फाऊंडेशचे फाऊंडर आणि देशातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू सद्गुरू सांगतात की जर तुम्ही चांगल्या अन्नाचे सेवन केले आणि नियमित प्राणायम केले तर हाय ब्लड प्रेशरच्या समस्येपासून काही आठवड्यातच आराम मिळतो.
प्राणायम
हाय बीपी ही समस्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात खूपच कॉमन बनली आहे. रोज प्राणायम करण्याची सवय ठेवल्यानं ब्लड प्रेशर नियंत्रणात आणता येऊ शकतं. प्राणायम ताण-तणाव कमी करते नसांना शांत करते आणि हृदय निरोगी ठेवण्यासही मदत होते.
कडधान्य खा
हाय बीपीची समस्या असल्यास स्प्राऊ्टस खायला हवेत. यात प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे हृदय, ब्लड प्रेशर दोन्ही व्यवस्थित राहते. सकाळच्या नाश्त्याला स्प्राऊट्स सॅलेड खा. यात काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि काळं मीठ घालून खा. तुम्ही मोड आलेल्या मूगात दही मिसळूनही खाऊ शकता.
हिरव्या भाज्या खा
बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन करा. यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात ज्यामुळे नसांना आराम मिळतो. भाज्या उकळवून किंवा हलक्या भाजून सूपच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता कमीत कमी तेल आणि कमी मीठात या भाज्या करा. सॅलेड किंवा स्मूदीच्या स्वरुपातही खाऊ शकता.