Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > उन्हाळ्यात सब्जा खाऊन पडाल आजारी, ‘या’ समस्या असतील तर सब्जा विसरा! पाहा कुणी सब्जा खावा - कुणी टाळावा...

उन्हाळ्यात सब्जा खाऊन पडाल आजारी, ‘या’ समस्या असतील तर सब्जा विसरा! पाहा कुणी सब्जा खावा - कुणी टाळावा...

sabja seeds good or bad for health : who should avoid eating sabja seeds in summer : उन्हाळ्यात गुणकारी म्हणून सब्जा खातो, पण तो नेमका कोणाला पचतो आणि कोणाला नाही ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 17:22 IST2026-04-06T17:12:58+5:302026-04-06T17:22:07+5:30

sabja seeds good or bad for health : who should avoid eating sabja seeds in summer : उन्हाळ्यात गुणकारी म्हणून सब्जा खातो, पण तो नेमका कोणाला पचतो आणि कोणाला नाही ते पाहा...

sabja seeds good or bad for health who should avoid eating sabja seeds in summer | उन्हाळ्यात सब्जा खाऊन पडाल आजारी, ‘या’ समस्या असतील तर सब्जा विसरा! पाहा कुणी सब्जा खावा - कुणी टाळावा...

उन्हाळ्यात सब्जा खाऊन पडाल आजारी, ‘या’ समस्या असतील तर सब्जा विसरा! पाहा कुणी सब्जा खावा - कुणी टाळावा...

उन्हाळा सुरू झाला की अंगाची लाहीलाही होते, आणि अशावेळी शरीराला आतून थंडावा देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करणं फायदेशीर ठरतं. आजकाल उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं सब्जाचं बी खाण्याचा एक नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. पाण्यात भिजवल्यानंतर फुगणाऱ्या या छोट्या बियांमध्ये शरीराला गारवा देण्याची क्षमता असते, त्यामुळे अनेकजण सरबत, फालूदा किंवा विविध पेयांमध्ये त्याचा वापर करतात. सब्जाच्या बियांमध्ये नैसर्गिक थंडावा देण्याचे गुणधर्म असतात, जे उन्हाळ्यातील उष्णता, पित्त आणि पोटाच्या तक्रारींवर रामबाण उपाय मानले जातात. इतकंच नाही तर, सब्जाच्या बिया पचन सुधारण्यास, शरीरातील उष्णता कमी करण्यास आणि हायड्रेशन टिकवून ठेवण्यास मदत करतात. सब्जाच्या बिया खाणं जितक फायदेशीर आहे, तितकच ते सर्वांसाठी सुरक्षित असेलच असे नाही...सब्जा खाणं तुमच्या आरोग्यासाठी त्रासदायक देखील ठरू शकते(who should avoid eating sabja seeds in summer).

अनेकदा आपण गुणकारी म्हणून सब्जा खातो, पण तो नेमका कोणाला पचतो आणि कोणाला नाही, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचं आहे. काही विशिष्ट आरोग्य समस्या किंवा शरीरप्रकृतीनुसार सब्जाच्या बिया खाल्ल्याने उलट त्रासही होऊ शकतो. यासाठीच “सब्जा कुणी खावा आणि कुणी टाळावा?” हा प्रश्न अनेकांना पडतो. द्विता होमिओपॅथीच्या डॉ. अंकिता हिरे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन सब्जा बियांचे फायदे, कोणासाठी ते उपयुक्त आहेत आणि कोणत्या परिस्थितीत टाळणं गरजेचं (is sabja seeds safe for everyone) याबद्दल अधिक माहिती शेअर केली आहे. 

सब्जा कुणी खावा ? 

१. ॲसिडिटी, जळजळ :- उन्हाळ्यात अनेकांना पित्त वाढणे, छातीत जळजळ होणे किंवा आंबट ढेकर येणे अशा समस्या जाणवतात. अशा वेळी सब्जाच्या बिया अत्यंत फायदेशीर ठरतात. सब्जाच्या बिया पाण्यात भिजवल्यानंतर त्यामध्ये एक प्रकारचा नैसर्गिक चिकटपणा तयार होतो. जेव्हा आपण हे पाणी पितो, तेव्हा या बिया पोटाच्या आतील थरांवर एक संरक्षक कवच तयार करतात. यामुळे जठरात तयार होणारे अतिरिक्त ॲसिड कमी होण्यास मदत होते आणि छातीतील व पोटातील जळजळ त्वरित थांबते. 

२. शरीरातील उष्णता :- उन्हाळ्यात कडक ऊन आणि उष्णतेमुळे शरीराचे तापमान वाढते, ज्याला आपण 'बॉडी हिट' म्हणतो. यामुळे हातापायांची आग होणे, डोळे जळजळणे किंवा खूप घाम येणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी सब्जाच्या बिया एका 'नॅचरल कूलंट' प्रमाणे काम करतात. सब्जाच्या बियांमध्ये नैसर्गिकरित्या थंडावा देणारे गुणधर्म असतात. जेव्हा आपण पाण्यात भिजवलेला सब्जा घेतो, तेव्हा तो शरीरातील अतिरिक्त उष्णता शोषून घेण्यास मदत करतो. यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि उन्हाळ्यामुळे येणारा थकवा कमी होतो.

आई - आजीच्या हातचं  कैरीचे पन्हे कसे मस्त लागते, पाहा पारंपरिक चवीसाठी ७ सिक्रेट टिप्स... 

३. बद्धकोष्ठता :- आजकालच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये आणि उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेकांना पोट साफ न होण्याची म्हणजेच बद्धकोष्ठतेची समस्या जाणवते. अशावेळी सब्जाच्या बिया एका नैसर्गिक 'लॅक्झेटिव्ह' प्रमाणे काम करतात. सब्जाच्या बियांमध्ये सोल्युबल फायबर (Soluble Fiber) भरपूर प्रमाणात असते. जेव्हा आपण या बिया पाण्यात भिजवून खातो, तेव्हा त्यातील फायबर पचनसंस्थेतील अतिरिक्त घाण पुढे ढकलण्यास आणि मल मऊ करण्यास मदत करतात. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. सब्जाच्या बिया केवळ पोट साफ करत नाहीत, तर त्या आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांची वाढ करण्यासही मदत करतात. यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि गॅसेस किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे यांसारख्या समस्या दूर राहतात.

४. जास्त घाम येणे :- उन्हाळ्यात उष्णतेमुळे अनेकांना अतिप्रमाणात घाम येतो, ज्यामुळे शरीरातील पाणी कमी होते आणि थकवा जाणवतो. अशावेळी सब्जाच्या बिया शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सब्जाच्या बियांमध्ये नैसर्गिक 'थंडावा' देण्याचे गुणधर्म असतात. जेव्हा आपण सब्जा खातो तेव्हा तो शरीरातील अंतर्गत उष्णता कमी करतो. शरीराचे तापमान आतून थंड राहिल्यामुळे, त्वचा थंड ठेवण्यासाठी शरीराला जास्त घाम गाळण्याची गरज पडत नाही. परिणामी, अतिप्रमाणात घाम येण्याची समस्या नैसर्गिकरित्या कमी होते. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील महत्त्वाची खनिजे बाहेर पडतात. सब्जामध्ये मॅग्नेशियम आणि लोहासारखी खनिजे असतात, जी शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास आणि घामामुळे येणारा अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात.

सब्जा खाणं कुणी टाळावं ? 

१. ५ वर्षांखालील लहान मुले :- लहान मुलांना, विशेषतः ५ वर्षांखालील बालकांना सब्जाच्या बिया देणं टाळावं. सब्जाच्या बिया पाण्यात भिजवल्यानंतर आकाराने मोठ्या होतात आणि त्यांना एक प्रकारचा बुळबुळीत थर येतो. लहान मुलांना या बिया नीट गिळता येत नाहीत. अशा वेळी या बिया त्यांच्या घशात किंवा श्वसननलिकेत अडकण्याची भीती असते, ज्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. लहान मुलांची पचनसंस्था अजूनही पूर्णपणे विकसित झालेली नसते. सब्जामध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, जे लहान मुलांच्या नाजूक पोटाला पचवणे जड जाऊ शकते. यामुळे त्यांना पोट दुखी किंवा जुलाब होण्यासारखे त्रास होऊ शकतात.

२. कमी रक्तदाब :- ज्या व्यक्तींचा रक्तदाब वारंवार कमी होतो किंवा ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी सब्जा खाणं टाळावं. सब्जाच्या बियांमध्ये रक्तदाब कमी करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असतात. हाय बीपी (High BP) असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर असले, तरी ज्यांचा बीपी आधीच कमी आहे, त्यांच्यासाठी हे घातक ठरू शकते. सब्जा खाल्ल्याने रक्तदाब आणखी खाली जाऊन चक्कर येणे, अशक्तपणा जाणवणे किंवा अंधारी येणे अशा समस्या उद्भवू शकतात.  रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे हृदयाच्या कार्यावर आणि रक्ताभिसरणावर ताण येऊ शकतो. त्यामुळे लो बीपीचंग त्रास असणाऱ्यांनी उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी सब्जा खाणं टाळावं. 

जिमला न जाताच कपिल शर्मा 'असा' झाला फिट! ६३ दिवसांत ११ किलो वेटलॉस करण्याचं सिक्रेट - पाहा नेमकं करायचं काय? 

३. गॅस, ब्लॉटिंग किंवा IBS चा त्रास :- ज्यांना वारंवार पोट फुगणे किंवा गॅस होण्याचा त्रास असतो, त्यांच्यासाठी सब्जा कधीकधी फायदेशीर ठरण्याऐवजी त्रासदायक ठरू शकतो. सब्जाच्या बियांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. जर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल, तर हे फायबर पचवताना पोटात गॅस निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे पोट डब्ब झाल्यासारखे वाटते. ज्यांना 'इरिटेबल बॉवेल सिंड्रोम' (Irritable Bowel Syndrome) आहे, त्यांच्या आतड्या अतिशय संवेदनशील असतात. सब्जा खाल्ल्याने आतड्यांच्या हालचालीवर परिणाम होऊन पोटात पेटके येणे किंवा अस्वस्थता वाढू शकते.

४. जुलाब :- सब्जा हा नैसर्गिकरित्या 'लॅक्झेटिव्ह' (Laxative) आहे, जो पोट साफ करण्यास मदत करतो. जुलाब होत असताना सब्जा खाल्ल्याने आतड्यांची हालचाल अधिक वाढते, ज्यामुळे जुलाब थांबण्याऐवजी अधिक वाढू शकतात. जुलाब होत असताना शरीरातील पाणी आधीच कमी झालेले असते. अशावेळी सब्जा खाल्ल्याने पचनसंस्थेवर अधिक ताण येतो, जो शरीरासाठी घातक ठरू शकतो.


Web Title : सब्जा के बीज: फायदे और गर्मी में किसे बचना चाहिए

Web Summary : सब्जा के बीज शरीर को ठंडक देते हैं और पाचन में मदद करते हैं। हालांकि, 5 वर्ष से कम उम्र के बच्चों, निम्न रक्तचाप, आईबीएस या दस्त वाले लोगों को इनसे बचना चाहिए। सब्जा एसिडिटी, शारीरिक गर्मी, कब्ज और अत्यधिक पसीने के लिए फायदेमंद है।

Web Title : Sabja Seeds: Benefits and Who Should Avoid Them in Summer

Web Summary : Sabja seeds cool the body and aid digestion. However, children under 5, those with low blood pressure, IBS, or diarrhea should avoid them. Sabja is beneficial for acidity, body heat, constipation and excessive sweating.