जेवण झालं की ग्लासभर पाणी प्यायचं अशी सवय बऱ्याच लोकांना सवय असते. पाणी पिणं हा आपल्या दिनचर्येतील एक महत्वपूर्ण भाग आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं तुमच्या पचनक्रियेत अडथळे येऊ शकतात. पाणी नेमकं कधी प्यावं ते समजून घेऊ. डॉ. राजकुमार यांनी एका हिंदी वेबसाईटशी बोलताना सांगितले की अन्न आपल्या शरीराची ऊर्जा आणि पोषणासाठी एक मुख्य स्त्रोत आहे. (How To Drink Water Between Meals)
जेव्हा आपण जेवतो तेव्हा शरीराची पचन प्रक्रिया सुरू होते. पोटातील पाचक रस आणि एंजाईम्स अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी आधार देतात जेणेकरून शरीराला पोषक तत्व मिळतील. अशा स्थितीत जर आपण जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायलो तर पाचक रस पातळ होतो. यामुळे पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. ज्यामुळे पचनक्रिया संथ होते आणि अन्न पचायला वेळ लागतो. (Right Way To Drink Water Between Meals)
जेवल्यानंतर किती वेळानं पाणी प्यायला हवं?
बरेच लोक जेवल्यानंतर लगेच पाणी पितात ज्यामुळे पोटात जड वाटणं, गॅस तयार होणं अशा अनेक समस्या उद्भवतात. प्रत्येकाची शरीर वेगवेगळे असते. जेवल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी तुम्ही पाणी पिऊ शकता. यादरम्यान अन्न व्यवस्थित पचण्याची सुरूवात होते. अन्न हळूहळू पचतं. जेव्हा तुम्ही थोड्या वेळानं पाणी पिता तेव्हा शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते आणि पचनक्रियाही प्रभावित होत नाही.
जेवताना पाणी पिऊ शकतो का?
जेवताना अजिबात पाणी प्यायचं नाही अशी चूक करू नका. जेवताना जर तुम्हाला तहान लागली तर थोडं पाणी पिऊ शकता. जेवण करताना १ ते २ घोट पाणी पिणं सामान्य आहे. यामुळे कोणतंही मोठं नुकसान होत नाही. जेवल्यानंतर खूप थंड पाणी पिणं टाळा. ज्यामुळे पचनक्रिया संथ होऊ शकते. रूम टेम्परेचरचं पाणी पिणं उत्तम मानलं जातं. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्या. कधीही पाणी बसूनच प्यावं, उभं राहून घाईघाईत पाणी पिणं टाळावं यामुळे पोटाचे विकार उद्भवू शकतात.
