अनेक घरांमध्ये ताक (Buttermilk) पिण्याची परंपरा पूर्वीच्या काळापासून आहे. दही फेटून केलेलं ताक नेहमीच हेल्दी पर्याय मानलं जातं. थंडीच्या दिवसांत लोक पाणी कमी पितात त्याऐवजी ताकाचा आहारात समावेश केला तर तब्येत चांगली राहण्यास मदत होईल. दही फक्त तहान भागवत नाही तर अन्न पचवण्यासही मदत करते. दह्यातील प्रोबायोटिक्स पोटात चांगले बॅक्टेरियाज वाढवतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. आयुर्वेदानुसार ताक पिणं प्रत्येक ऋतूसाठी चांगले ठरते. थंडीच्या दिवसांत ताक प्यावं पण जास्त थंड ताक पिऊ नये.(How To Drink Buttermilk In Winter)
आयुर्वेद एक्सपर्ट आचार्य बाळकृष्ण यांनी अलिकडेच एका पोस्टमध्ये रोज ताक पिण्याच्या फायद्यांबाबत सांगितले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक वातावरणात ताक पिणं फायदेशीर ठरतं. खासकरून अशा लोकांना ज्यांना पोटाशी संबंधित ससमस्या आहेत. ताकाच्या सेवनानं भूक न लागणं, ब्लोटींग अशा समस्या दूर होतात. सैंधव मीठ, भाजलेल्या ताकात घालून प्यायल्यास ताकाची फक्त चव वाढत नाही तर अन्नही लवकर पचतं.
ताकात कॅल्शियम, प्रोबायोटीक्स आणि इलेक्ट्रोलाईट्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे पोटाचे तापमान बॅलेंन्स राहते आणि पचनक्रिया एक्टिव्ह राहते. ज्या लोकांना जेवल्यानंतर गॅस, जडपणा वाटत असेल तर ताक पिणं त्यांच्यासाठी फायदेशीर ठरतं. यातील सैंधव मीठ इलेक्ट्रोलाईट बॅलेन्स करते. भाजलेललं जीरं डायजेशन सुधारते. काळी मिरी पोटातील गॅस कमी करते.
ताकात काय घालून प्यायल्यास फायदे मिळतात?
एक ग्लास ताक घ्या. त्यात १ चमचा सैंधव मीठ, अर्धा चमचा भाजलेली जीरंपावडर आणि काी मिरी घालून व्यवस्थित फेटून घ्या. जेवणानंतर या ताकाचे सेवन करा. जर तुम्हाला ताक प्यायला आवडत नसेल तर तुम्ही ताकाच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ताकाची कढी, ताकातलं पीठलं, मसाला ताक असे पदार्थ आहारात घ्या.
सर्दी, खोकल्याचा त्रास असल्यास ताक प्यावं की नाही?
ज्यांना सतत सर्दी, खोकल्याचा त्रास होतो त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. ज्या लोकांना एसिडिटीची समस्या आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानंच ताक प्यावं.
