Join us

रोज ‘या’ वेळेत तूप खा, रूप तर येईलच हाडंही होतील पोलादी; रामदेव बाबांचा खास सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:19 IST

Right Way To Consume Ghee : योग गुरू बाबा रामदेव सांगतात की आयुर्वेदात तुपाला पौष्टीक आणि पचायला सोपं सांगितलं आहे.

तूप भारतीय स्वंयपाकघरातील एक महत्वाचा पदार्थ आहे. भारतात जवळपास अनेक गोड पदार्थ बनवण्यासाठी तुपाचा भरभरून वापर केला जातो. रोजच्या स्वयंपाकातही बरेचजण तुपाची फोडणी देतात तर काहीजण वरण भातावर घालून खातात. सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. योगगुरू बाबा रामदेव (Yog Guru Baba Ramdev) यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये रिकाम्या पोटी तूप खाण्याचे जबरदस्त फायदे सांगितले आहेत. रिकाम्यापोटी तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती समजून घेऊ. (Right Way To Eat Ghee)

योग गुरू बाबा रामदेव सांगतात की आयुर्वेदात तुपाला पौष्टीक आणि पचायला सोपं सांगितलं आहे. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केले तर शरीर आणि मेंदू चांगलं काम करतो. बाबा रामदेव यांच्या मते आपला मेंदू जवळपास दीड किलोचा असतो. याच्या आरोग्यासाठी चांगले फॅटी एसिड्स गरजेचे असतात. तूप मेंदूतील न्युरॉन्सना मजबूत बनवतात आणि मेमरी पॉवर वाढवतात.

तुपाच्या सेवनानं मेंदूशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. डोळ्यासाठी तूप चांगले असते. त्वचेत मऊपणा टिकून राहतो आणि कोरडेपणा दूर होतो.  यातील हेल्दी फॅट्स मेटाबॉलिझ्मला सपोर्ट देतात. मसल्स आणि हाडं मजबूत राहतात. सांधेदुखीपासून आराम मिळतो. इम्यूनिटी वाढते. आयुर्वेदानुसार तूप वात, पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित करते.

रिसर्चनुसार तूप हे नित्यसेवनासाठी अत्यंत पौष्टीक मानले गेले आहे. आयुर्वेदग्रंथानुसार गाईचे तूप अधिक सकस, उत्तम मानले जाते. यात ए,डी, ई, के व्हिटामीन्स असतात. ज्यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते. (Ref) पण किती प्रमाणात तूप खावं हे सुद्धा माहित असायला हवं. यात सॅच्युरेडेट फॅट्स असल्यामुळे कोलेस्टेरॉल आणि हृदयाशी संबंधित समस्या असल्यास कमीत कमी प्रमाणात तुपाचे सेवन करावे.

रिकाम्या पोटी तूप कसे खावे?

रामदेव बाबा सांगतात की सकाळी रिकाम्या पोटी १ ते २ चमचे गाईचे तूप कोमट करून घ्या नंतर १ चिमूटभर सैंधव मीठ घ्या वरून १ ते २ ग्लास गरम पाणी प्या. तूप नेहमी अस्सल असावे ज्यामुळे त्याचे फायदे मिळतील. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्यानं वजनही वाढू शकतं. डायबिटीस, हाय कोलेस्टेरॉल, लिव्हरची समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानं तूप खावे.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य