Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध 

भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध 

Health Tips About Cholesterol: काेलेस्टेरॉलचा त्रास असणारे लोक भातापासून ४ हात लांब राहतात. खरंच भात खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2025 09:10 IST2025-06-22T09:04:43+5:302025-06-22T09:10:01+5:30

Health Tips About Cholesterol: काेलेस्टेरॉलचा त्रास असणारे लोक भातापासून ४ हात लांब राहतात. खरंच भात खाऊन कोलेस्टेरॉल वाढतं का?

rice is really responsible for increasing cholesterol level? | भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध 

भात खाल्ल्यावर कोलेस्टेरॉल वाढण्याची भीती वाटते? बघा भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध 

Highlightsशेतात पिकलेला तांदूळ आणि आपल्या घरात येणारा तांदूळ यात खूप मोठा फरक असतो. कारण या दरम्यान तांदळावर खूप प्रक्रिया केली जाते.

भात हा बहुतांश लोकांचा अतिशय आवडीचा पदार्थ. लहान मुलांना तर साधं वरण भात, तूप मीठ भात विशेष आवडतात. मेतकूट भात, लोणचं भात, फोडणीचा भात, दही भात असे भाताचे पदार्थही अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण जसं जसं वय वाढत जातं, तसं तसं भात खाण्याची भीती वाटत जाते. भात खाल्ल्याने वजन वाढतं, रक्तातील साखरेचे प्रमाणही वाढते, असं आपण नेहमीच ऐकतो. भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉलही वाढतं, असं म्हणतात. हे सगळं कितपत खरं आहे आणि भाताचा कोलेस्टेरॉलवर नेमका काय परिणाम होतो ते पाहूया..

 

भात खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढतं का?

भाताचा आणि कोलेस्टेरॉलचा नेमका काय संबंध याविषयीची जी माहिती U.S Department of Agriculture यांनी प्रकाशित केली आहे त्यानुसार शेतात पिकलेला तांदूळ आणि आपल्या घरात येणारा तांदूळ यात खूप मोठा फरक असतो. कारण या दरम्यान तांदळावर खूप प्रक्रिया केली जाते.

फक्त १० रुपये खर्च करा, पिवळट दात पांढरेशुभ्र होऊन चमकतील, दाढ दुखणंही थांबेल

त्यामुळे तांदळामधले कित्येक पौष्टिक घटक नाहीसे होतात. आता भातामध्ये फक्त कार्ब्स राहतात. भात जर तुम्ही योग्य प्रमाणात खाल्ला तर त्यामुळे वजन वाढत नाही. पण तो खाताना त्याच्यासोबत भाजी, कडधान्ये, डाळी असं काहीतरी खाणं गरजेचं असतं. 

 

अभ्यासानुसार असंही समोर आलं आहे की कोलेस्टेरॉल वाढण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीही भात करणीभूत ठरत नाही. भात केवळ पचायला हलका असतो.

खमंग-खुसखुशीत आणि किंचित गोडसर दुधातली दशमी, घ्या रेसिपी- प्रवासातला पारंपरिक पौष्टिक नाश्ता

पण इतर धान्यांच्या तुलनेत त्यात पौष्टिक घटक खूप कमी असतात. त्यामुळे पांढरा भात खाण्यापेक्षा इतर काही धान्यं खावीत जी जास्त पोषण देऊ शकतील आणि शरीरातली बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करू शकतील. तसेच पांढऱ्या भातापेक्षा ब्राऊन राईस किंवा फोर्टीफाईड राईस खाणे अधिक चांगले असंही तज्ज्ञ सांगतात. 
 

Web Title: rice is really responsible for increasing cholesterol level?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.