कॅन्सरच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आपल्या जवळच्या लोकांपैकी कोणाला ना कोणाला कॅन्सर झाल्याच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. शिवाय या आजाराबाबतची सगळ्यात गंभीर बाब म्हणजे बहुतांश केसेसमध्ये असं दिसून येतं की जेव्हा आजार जास्त बळावलेला असतो, तेव्हाच त्याची लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे मग उपचारावर खूप मर्यादा येतात. म्हणूनच कॅन्सर होऊ नये म्हणूनच अधिकाधिक प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवे, असं तज्ज्ञ याबाबतीत नेहमीच सांगतात. आता याविषयी नुकताच एक अभ्यास केला गेला असून त्यामध्ये कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी एक खास उपाय सुचविण्यात आलेला आहे.(how to reduce risk of cancer?)
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी १० मिनिटांचा उपाय
इंग्लंड येथील न्यू कॅसल विद्यापीठाने याबाबतीत नुकताच एक अभ्यास केला. त्यांचा हा अभ्यास इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर यामध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
पाहा वजन झरझर कमी करणाऱ्या पोळ्या! कणकेत मिसळा ४ पदार्थ, पोळ्या होतील मऊ-पोळ्या खाऊनही चरबी गायब
त्यामध्ये अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांनी असा अहवाल दिला आहे की रोज जर अगदी नियमितपणे तुम्ही १० मिनिटांसाठी हेवी वर्कआऊट केलं तर कॅन्सरचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. यामध्ये खूप तीव्र व्यायाम केलेल्या काही लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये असं आढळून आलं की हेवी वर्कआऊटनंतर रक्तामध्ये असे काही कण तयार होतात जे इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी तसेच रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.
शिवाय चयापचय क्रियाही अधिक चांगली करतात. या कणांना जेव्हा कॅन्सर सेल्सच्या जवळ आणलं गेलं तेव्हा त्यांची वाढ कमी झाल्याचं दिसून आलं.
यावरून अभ्यासकांनी हा निष्कर्ष काढला आहे. ज्यांना व्यायामासाठी भरपूर वेळ देणं शक्य होत नाही, ते लोकही सायकलिंग, रनिंग, जाॅगिंग, स्विमिंग, स्क्वॅट्स, पुशअप्स असे हेवी व्यायाम करू शकतात. यामुळे वजनही नियंत्रित राहण्यास नक्कीच मदत होईल.
