Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थंडीत अंगदुखी, सांधे आखडल्याने हैराण? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हाडांचं दुखणं वाढण्यापूर्वी जागे व्हा

थंडीत अंगदुखी, सांधे आखडल्याने हैराण? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हाडांचं दुखणं वाढण्यापूर्वी जागे व्हा

Relieve Joint pain muscular pain with Easy ayurvedic remedy : रोजचे काम आणि दगदग यानेही अनेकदा हा थकवा किंवा अंगदुखी जाणवते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 04:35 PM2023-12-19T16:35:35+5:302023-12-19T16:39:39+5:30

Relieve Joint pain muscular pain with Easy ayurvedic remedy : रोजचे काम आणि दगदग यानेही अनेकदा हा थकवा किंवा अंगदुखी जाणवते.

Relieve Joint pain muscular pain with Easy ayurvedic remedy : Body aches in the cold, puzzled by stiff joints? Doctors say 1 simple solution, wake up before the bone pain worsens | थंडीत अंगदुखी, सांधे आखडल्याने हैराण? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हाडांचं दुखणं वाढण्यापूर्वी जागे व्हा

थंडीत अंगदुखी, सांधे आखडल्याने हैराण? डॉक्टर सांगतात १ सोपा उपाय, हाडांचं दुखणं वाढण्यापूर्वी जागे व्हा

थंडीच्या दिवसांत आपल्याला सर्दी-खोकला, त्वचेचा कोरडेपणा या तक्रारी उद्भवतात. त्याचप्रमाणे अंगदुखी किंवा सांधेदुखीच्या तक्रारीही डोकं वर काढतात. गारठ्यामुळे सांधेदुखीमध्ये शरीरातील हाडे, स्नायू, सांधे सगळेच दिर्घकाळ ठणकत राहते. वात दोष किंवा हाडांशी संबंधित तक्रारी असणाऱ्यांना सांधेदुखीची समस्या जास्त त्रास देते. एकदा सांधेदुखी सुरु झाली की आपल्याला काहीच सुधरत नाही. पुरेशी झोप झाली, योग्य आहार घेतला, व्यायामही करत असू तरीही ही अंगदुखी हैराण करते. सकाळी उठल्यापासून अंगदुखी  जाणवत असेल तर अस्वस्थता येते (Relieve Joint pain, muscular pain with Easy ayurvedic remedy). 

रोजचे काम आणि दगदग यानेही अनेकदा हा थकवा किंवा अंगदुखी जाणवते.मग आपण एखादं तेल लावून हे दुखणं घालवण्याचा प्रयत्न करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधं आणतो, पण त्याचा तात्पुरताच उपयोग होतो. हा त्रास कायमचा बंद व्हावा यासाठी १ सोपा उपाय प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री सांगतात. घरात असलेल्या गोष्टींपासून एक काढा तयार करुन तो नियमित घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. पाहूयात हा काढा कसा तयार करायचा आणि कसा घ्यायचा. 

(Image : Google)
(Image : Google)

उपाय काय? 

धणे आणि सुंठ या २ गोष्टींपासून हा काढा तयार होतो. धणे कुटून त्याची बारीक पूड करायची, तसेच सुंठेचीही पूड करायची. बाजारात दोन्हीची रेडीमेड पूडही मिळते. एकदम बारीक पावडर न करता थोडी ओबडधोबड पावडर करायची. या दोन्ही पूड समान मात्रेत एकत्र करुन एका डब्यात भरुन ठेवायच्या. रात्री २ चमचे किंवा १० ग्रॅम मिश्रण घ्यायचे आणि पाण्यात भिजवायचे. सकाळी उठल्यावर हे मिश्रण उकळायचे आणि गाळून त्यात एक चमचा एरंडेल तेल घालून हा काढा प्यायचा. शरीरातील न पचलेले अन्न बाहेर टाकण्यासाठी आणि आमवात कमी करण्यासाठी एरंडेल अतिशय फायदेशीर ठरते. २ ते ४ आठवडे हा उपाय केल्यास अंगदुखी नक्कीच कमी होण्यास मदत होईल. 

Web Title: Relieve Joint pain muscular pain with Easy ayurvedic remedy : Body aches in the cold, puzzled by stiff joints? Doctors say 1 simple solution, wake up before the bone pain worsens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.