थंडीच्या (Winter Season) दिवसांत बाजारात ताजे मुळे दिसायला सुरूवात होते. मुळ्याची भाजी बऱ्याच जणांना खायला आवडते तर काहीजणांना मुळा अजिबात आवडत नाही. लाल मुळा खावा की पांढरा असा प्रश्न अनेकांना पडतो. नेमका कोणता मुळा फायदेशीर ठरतो समजू घेऊ. (Red Raddish Vs White Raddish Which Is Healthier For You)
पांढरा मुळा का खावा?
मुळा भारतीय आहारात कोशिंबीर, भाजी किंवा पराठ्यांच्या स्वरूपात आवर्जून खाल्ला जाणारा घटक आहे. पांढरा मुळा यकृत आणि पोटातील विषारी घटक बाहेर काढून शरीर डिटॉक्स करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा शरीरातील उष्णता कमी करायची आहे. त्यांच्यासाठी पांढरा मुळा खाणं उत्तम ठरतं.
लाल मुळा का खावा?
लाल मुळा दिसायला आकर्षक आणि आकाराचे लहान असला तरी आरोग्याच्या दृष्टीनं तो अधिक शक्तीशाली मानला जातो. लाल मुळ्याच्या गडद रंग त्यातील एंथोसायनिन या घटकामुळे असतो. जे एक उत्तम एंटी ऑक्सिड्ंट्स आहे. हे एंटी ऑक्सिडंट हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात आणि शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. पांढऱ्या मुळ्याच्या तुलनेत लाल मुळ्यामध्ये व्हिटामीन सी आणि झिंकचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वेगानं वाढण्यास मदत होते. याशिवाय लाल मुळा रक्तातील ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्यास आणि त्वचेला तजेलदार बनवण्यास मदत होते.
मुळा कोणता जास्त फायदेशीर हे तुमच्या गरजांवर अवलंबून असते. जे तुमचे उद्दीष्ट पचनक्रिया सुधारणं आणि पोट साफ ठेवणं हे असेल तर पांढरा मुळा आहारात घ्या. जर तुम्हाला शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची असेल आणि हृदयाचे आरोग्य जपायचे असेल तर लाल मुळा खाणं अधिक फायदेशीर ठरतं.
तज्ज्ञांच्यामते कोणत्याही एका प्रकारावर अवलंबून न राहता दोन्ही मुळ्यांचे सेवन आलटून पालटून केल्यास आरोग्याला सर्वसमावेशक फायदे मिळतात. कोशिंबीर म्हणून कच्चा मुळा खाणं हे त्यातील पोषक तत्व टिकवून ठेवण्यासाठी सर्वात चांगला मार्ग आहे.
