Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > वाचा रामदेव बाबांचा खास सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोका होईल कमी आणि बीपी-शुगरही छळणार नाही

वाचा रामदेव बाबांचा खास सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोका होईल कमी आणि बीपी-शुगरही छळणार नाही

Health Tips For Healthy Heart: हृदयाचं आरोग्य ठणठणीत ठेवायचं असेल तर सुरुवातीपासूनच तब्येतीची थोडी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहा... (healthy food for heart)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2024 09:10 AM2024-05-14T09:10:53+5:302024-05-14T12:22:27+5:30

Health Tips For Healthy Heart: हृदयाचं आरोग्य ठणठणीत ठेवायचं असेल तर सुरुवातीपासूनच तब्येतीची थोडी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहा... (healthy food for heart)

Ramdev baba's guidance about how to take care of heart, how to reduce the chances of heart attack | वाचा रामदेव बाबांचा खास सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोका होईल कमी आणि बीपी-शुगरही छळणार नाही

वाचा रामदेव बाबांचा खास सल्ला, हार्ट ॲटॅकचा धोका होईल कमी आणि बीपी-शुगरही छळणार नाही

Highlightsरक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि वजन या ४ गोष्टी नियंत्रित ठेवल्या तर हृदयाचे आरोग्य उत्तम राहायला खूप मदत होते.

हल्ली बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम बहुतांश लोकांच्या आरोग्यावर दिसून येत आहे. सगळ्यात जास्त समस्या निर्माण झाली आहे ती चुकीची आहारपद्धती आणि व्यायामाचा किंवा शारिरीक हालचालींचा अभाव या दोन गोष्टींमुळे. त्यामुळेच तर हल्ली कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अगदी विशी- पंचविशीतल्या तरुणाईलाही हृदय विकाराचा सौम्य झटका आल्याच्या कित्येक घटना आपण ऐकतो.. म्हणूनच हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी करण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे...(Ramdev baba's guidance about how to take care of heart)

 

हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपाय

हृदयाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्या आणि कोणत्या टाळाव्या, याविषयी योगगुरू रामदेवबाबा यांनी दिलेली माहिती इंडिया टीव्ही यांनी प्रकाशित केली आहे.

आमरस पुरीचा बेत करायचा? बघा १ सोपी ट्रिक- गार झाल्यानंतरही पुऱ्या राहतील टम्म फुगलेल्या

त्यानुसार लठ्ठपणा, मधुमेह या दोन गोष्टी सगळ्यात आधी नियंत्रित ठेवल्या पाहिजेत. यासाठी तुम्ही दररोज नियमितपणे काही मिनिटांसाठी तरी व्यायाम करायलाच पाहिजे. काहीच व्यायाम होत नसेल तर कमीतकमी पायऱ्या चढणे- उतरणे, सुर्यनमस्कार अशा काही शारिरीक हालचाली तरी करायलाच पाहिजेत.

 

व्यसनांपासून दूर राहा, जंकफूडचे प्रमाण कमी करा, वाॅकिंग, जॉगिंग, सायकलिंग यापैकी जो आवडेल तो व्यायाम करा तसेच स्ट्रेस घेणं कमी करा असा सल्लाही देण्यात आला आहे. याशिवाय वयाच्या तिशीनंतर काही तपासण्याही नियमितपणे कराव्या.

पॅकेटबंद ज्यूस खरंच ‘नॅचरल’ असते का? पोटाचा सुटलेला आकार-किडनीचे आजार लागतील मागे

रक्तदाब महिन्यातून एकदा, कोलेस्ट्रॉल ६ महिन्यातून एकदा, शुगर दर ३ महिन्याने, डोळ्यांची तपासणी दर ६ महिन्यांनी आणि फूल बॉडी चेकअप वर्षातून एकदा करायला पाहिजे. रक्तदाब, शुगर, कोलेस्ट्रॉल आणि वजन या ४ गोष्टी नियंत्रित ठेवल्या तर हृदयाचे आरोग्य उत्तम राहायला खूप मदत होते. त्यासाठी आहारातले साखरेचे, मीठाचे प्रमाण कमी करा, प्रोटीन्सचे प्रमाण वाढवा. पुरेशा प्रमाणात पाणी प्या. घरचे सकस, ताजे अन्न खाण्यास प्राधान्य द्या, सुकामेवा योग्य प्रमाणात घ्या, असा सल्ला रामदेव बाबा देतात. 
 

Web Title: Ramdev baba's guidance about how to take care of heart, how to reduce the chances of heart attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.