Join us

मनुक्याचं पाणी ४ आजारांवर बहुगुणी; रक्तदाब- त्वचेचे विकारही राहतील नियंत्रणात, पाहा रोज पिण्याचे फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 19:51 IST

raisin water benefits: skin care tips: Benefits of drinking raisin water: Can we drink raisin water daily: Does raisin water make your skin glow: Is there any side effects of raisin water: 7 benefits of drinking kishmish (raisin) water every morning: Is It Good To Drink Raisin Water On An Empty Stomach: भिजवलेले मनुके खाण्याचे आणि त्याचे पाणी प्यायल्यानं काय होते जाणून घेऊया.

सुका मेवा म्हटलं की, अनेकजण आवडीने खातात. पदार्थाची चव वाढवण्यासाठी मनुके फायदेशीर आहे. (raisin water benefit) यामध्ये पचन, हृदयाचे आरोग्य, मधुमेहाचा वाढता धोका आणि तोंडाचे आरोग्य सुधारण्याची क्षमता आहे. मनुक्यामध्ये भरपूर पोषक तत्व आणि अँटी- ऑक्सिडंट्स असतात याचे सेवन केल्यानं शरीराला एक नाही तर अनेक फायदे होतात. (Can we drink raisin water daily)

रात्रभर पाण्यात ४ ते ५ मनुके भिजत घालून दुसऱ्या दिवशी याचे पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळतील. (Does raisin water make your skin glow) नियमितपणे भिजवलेल्या मनुक्याचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते, तसेच बॉडी डिटॉक्सिफाय होऊन आरोग्य सुधारते. भिजवलेले मनुके खाण्याचे आणि त्याचे पाणी प्यायल्यानं काय होते जाणून घेऊया. 

धुसर दिसतं-डोळ्यातून सतत पाणी येतं? ८ लक्षणे सांगतात तुमची दृष्टी अधू होते आहे.. तपासा..

1. बॉडी डिटॉक्सिफाय करण्यासाठी 

 

  • जेव्हा शरीरात विषारी पदार्थ असतात. तेव्हा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. 

  • त्यामुळे विषारी घाणेरडे पदार्थ काढून टाकण्यासाठी मनुका शरारीराला डिटॉक्सिफाय करतो. 

2. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी 

  • जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर आपण सारखे आजारी पडत राहू. 

  • सर्दी, खोकला किंवा बदलत्या वातावरणाचा आपल्यावर लगेच परिणाम होतो. 

  • अशावेळी भिजवलेले मनुके खाल्ल्याने व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स मिळतो. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. शरीराला अनेक संसर्गाशी चांगल्या प्रकारे लढण्यास सक्षम करते.  

  • मनुक्यात भरपूर प्रमाणात लोह असते. भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. यामुळे लाल रक्तपेशी वाढून अशक्तपणा दूर होतो. 

 

3. त्वचेच्या समस्या 

  • भिजवलेले मुनके किंवा त्याचे पाणी प्यायल्यानं त्वचेच्या समस्या दूर होतात. 

  • भिजवलेल्या मनुक्यांमध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

  • तसेच व्हिटॅमिन ए आणि ई देखील असते. जे त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे. 

  • यामुळे अकाली वृद्धत्व येण्याची क्षमता कमी करते. 

 

4. मनुक्याचे पाणी किंवा खाण्याचे इतर फायदे 

  • हाडे मजबूत करण्यासाठी भिजवलेले मनुके किंवा त्याचे पाणी पिऊ शकता. यामुळे हाडांना कॅल्शियम मिळतं

  • मनुक्याचे पाणी प्यायल्यानं पचनसंस्था सुरळीत होते. तसेच चावून खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. शरीराला फायबर आणि पोटॅशियम चांगल्या प्रकारे मिळतं. 

  • यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहाते. यात असणारे फायबर पंचनसंस्थेसाठी चांगले आहे. 

  • बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी भिजवलेले मनुके खाऊ शकता.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना