Bad cholesterol : शरीरात बॅड कोलेस्टेरॉलची वाढ होणं आरोग्यासाठी घातक असतं. खासकरून हृदयाच्या आरोग्यावर बॅड कोलेस्टेरॉलचा वाईट प्रभाव पडतो. हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅकचा धोकाही वाढतो. त्यामुळेच शरीरात बॅड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढताच डॉक्टर सावध होण्याचा सल्ला देत असतात. हाय कोलेस्टेरॉल आजकाल एक फारच कॉमन समस्या झाली आहे. याला कारण आजची अनहेल्दी लाइफस्टाईलही आहे. तेलकट पदार्थ खाणं, जंक फूड, फास्ट फूड अधिक खाणं, एक्सरसाईज न करणं अशा वेगवेगळ्या कारणांमुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्याचा उपाय?
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच डाएटमध्ये काही गोष्टींचा आवर्जून समावेश करण्यास सांगितलं जातं. हिवाळ्यात मिळणारा मुळाही बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मुळ्याचं सेवन कसं करावं हे जाणून घेऊ.
मुळ्यामधील पोषक तत्व
मुळ्यामध्ये पोटॅशिअम आणि एंथोसायनिन नावाचे तत्व असतात. हे ब्लड प्रेशर लेव्हल कमी करण्यास मदत करतात आणि शरीरातील जमा बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत मिळते. मुळाच्या पांढऱ्या भागात डायटरी फायबर असतं. हेच डायटरी फायबर बॅड कोलेस्टेरॉल आणि फॅट कमी करतं. ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
त्यासोबतच मुळ्यामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट्सही आढळतात. जे शरीरात कोलेस्टेरॉल लेव्हल बॅलन्स करण्यास मदत करतात. तसेच मुळात आढळणाऱ्या पोषक तत्वामुळे इतर पद्धतीनेही हार्ट, इम्यून सिस्टीम, डायजेशन सिस्टीम आणि एकंदर आरोग्याला फायदे मिळतात.
हिवाळ्यात मुळा खाण्याचे फायदे
वजन कमी होईल
भरपूर प्रमाणात डायटरी फायबर असल्याने मुळाचं सेवन केल्यास शरीराचं मेटाबॉलिक बूस्ट होतं. अशात तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
बॉडी डिटॉक्स
रोज मुळा खाल्ल्याने शरीरात जमा विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत मिळते. बॉडी डिटॉक्स झाल्यास अनेक आजारांचा धोका आपोआप कमी होतो.
डायबिटीसमध्ये फायदेशीर
ज्या लोकांची ब्लड शुगर लेव्हल हाय असते त्यांच्यासाठी मुळा खूप फायदेशीर आहे. मुळा एक जीआय फूड आहे आणि यात डायटरी फायबर भरपूर असतं. मुळा खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते.
बद्धकोष्ठता होईल दूर
हिवाळ्यात होणारी बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही मुळाच्या सेवन फायदेशीर ठरतं. मुळामधील डायटरी फायबर डायजेशन सुधारतात आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.