Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका

कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका

Health Tips: कुत्र्यांशी खेळताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. लहान मुलांना तर विशेष जपायला हवं...(how to take care of your self while playing with street dog?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 13:58 IST2025-08-22T13:29:39+5:302025-08-22T13:58:12+5:30

Health Tips: कुत्र्यांशी खेळताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. लहान मुलांना तर विशेष जपायला हवं...(how to take care of your self while playing with street dog?)

rabies can cause from the saliva of dog, how to take care of your self while playing with street dog | कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका

कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज, कुत्र्यांशी खेळताना ५ चुका टाळा- जीवावर बेतण्याचा धोका

Highlightsकुत्र्याने चावल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. पण कुत्र्याच्या दाताचा हलकासा ओरखडा जरी शरीराला लागला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

कुत्रे हा अनेकांचा अतिशय आवडीचा प्राणी. त्याच्यासारखा इमानदार, विश्वासू प्राणीही दुसरा नाहीच.. त्यामुळे ज्यांच्या घरी कुत्रा पाळलेला असतो त्यांच्यासाठी तर तो कुटूंबातल्या एखाद्या सदस्यासारखाच असतो. आता घरी पाळलेल्या कुत्र्यांना व्यवस्थित लसीकरण केलेले असते. त्यामुळे त्यांचा धोका नसतो. पण कित्येकजण असेही असतात ज्यांना स्ट्रीट डॉगशी खेळायला खूप आवडते. गल्लीत फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर ते अक्षरश: जीव ओवाळून टाकतात. कुत्र्यांशी खूप खेळतात. लाडाने कुत्रेही त्यांना चाटतात. पण हाच खेळ, हेच प्रेम जीवावरही बेतू शकतं. त्यामुळे कुत्र्यांशी खेळताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी. (how to take care of your self while playing with street dog?)

 

कुत्र्यांच्या लाळेतूनही होऊ शकतो रेबिज

आतापर्यंत रेबिजच्या समोर आलेल्या बहुतांश केसेस अशा होत्या की कुत्रं चावल्यानंतर जर त्याकडे दुर्लक्ष केलं, याेग्य ते उपचार वेळीच घेतले नाही तर त्यामुळे रेबिज व्हायचा. हा आजार वाढल्यास त्यामुळे थेट मृत्यूही ओढवतो.

कमी झालेलं वजन काही दिवसांतच पुन्हा पटकन वाढतं? डॉक्टर सांगतात ६ टिप्स- वजन वाढणारच नाही

पण नुकतीच उत्तरप्रदेशमधली रेबिज झालेली जी केस समोर आली त्या केसनुसार कुत्र्याच्या लाळेमुळे लहान मुलाला रेबिज झाल्याचे दिसून आले. या मुलाला कुत्र्याने चाटले. कुत्र्याने जिथे चाटले तिथे त्या मुलाला आधीच जखम झाली होती. या जखमेमधून कुत्र्याच्या लाळेतले जंतू मुलाच्या शरीरात गेले आणि काही दिवसांतच त्याच्यामध्ये रेबिजची लक्षणं दिसू लागली. या मुलाला दवाखान्यात नेले असता तिथेच त्याचा मृत्यू झाला. म्हणूनच कुत्र्यांशी खेळताना काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

 

कुत्र्यांशी खेळताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी?

१. कुत्र्याने चावल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जा. पण कुत्र्याच्या दाताचा हलकासा ओरखडा जरी शरीराला लागला तरी त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. कुत्र्यांशी खेळल्यानंतर आठवणीने हात पाय धुवून टाका. फक्त तळहातच नाही तर अगदी कोपऱ्यापर्यंत हात धुवून टाका.

गौरी- गणपतीच्या दिवसांसाठी खास ब्यूटी टिप्स- किचनमधले ५ पदार्थ त्वचेला लावा, डेडस्किन, टॅनिंग गायब

३. खेळताना कुत्रे जर तुमच्या खूप जवळ आले असेल तर कपडेही बदलून टाका.

४. कुत्र्याला तुमच्या शरीराला चाटू देऊ नका. विशेषत: शरीरावर जिथे जखम असेल तो भाग तर अगदी लक्षपुर्वक कुत्र्यांपासून दूर ठेवा. 
 

Web Title: rabies can cause from the saliva of dog, how to take care of your self while playing with street dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.