Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण..

सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण..

Puffy Face In Morning Causes: जर ही सूज जास्तकाळ राहिली, तर ती किडनी रोगाचे लक्षणही असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 14:08 IST2026-03-28T09:40:28+5:302026-03-28T14:08:13+5:30

Puffy Face In Morning Causes: जर ही सूज जास्तकाळ राहिली, तर ती किडनी रोगाचे लक्षणही असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Puffy face in the morning it could be sign of kidney problem | सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण..

सकाळी चेहरा टम्म फुगलेला दिसतो का? दुर्लक्ष टाळा, असू शकतो किडनीचा आजार-पाहा कारण..

Puffy Face In Morning Causes: आपलं शरीर हे शरीरात बिघाडाचे नियमितपणे काहीना काही संकेत देत असतं. म्हणजे अनेकदा सकाळी झोपेतून उठल्यावर अचानक काहीतरी वेगळं जाणवायला लागतं, काही तरी दुखायला लागतं किंवा मग एखाद्या अवयवांमध्ये काही बदल दिसतो. असाच एक संकेत म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर डोळ्यांभोवती सूज आणि चेहरा फुगलेला दिसतो. रात्री जास्त वेळ जागणं किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे ही या समस्येची कॉमन कारणं सांगितली जातात. पण काही केसेसमध्ये कारणं वेगळी देखील असू शकतात. जर ही सूज जास्तकाळ राहिली, तर ती किडनी रोगाचे लक्षणही असू शकते. त्यामुळे अशा स्थितीत दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, अनेकदा आपण किडनीच्या आजारांना केवळ लघवीतील बदलांशी जोडतो, पण ते पूर्णपणे बरोबर नाही. किडनीचे कार्य बिघडल्यास शरीरातील इतर भागांमध्येही लक्षणे दिसू शकतात. सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे सकाळी डोळ्यांभोवती येणारी सूज, ज्याला पेरिऑर्बिटल पफीनेस असे म्हणतात. हे तेव्हा घडते जेव्हा किडनीमधून प्रोटीन गळती सुरू होते.

चेहरा आणि डोळ्यांवर सूज का येते?

जेव्हा किडनी खराब होऊ लागतात, तेव्हा अल्ब्युमिन नावाचे महत्त्वाचे प्रोटीन लघवीतून बाहेर पडू लागते. हे प्रोटीन रक्तवाहिन्यांमध्ये द्रव संतुलित ठेवण्याचे काम करते.

किडनीच्या सूक्ष्म फिल्टरिंग युनिट्सना इजा झाल्यास अल्ब्युमिनची कमतरता निर्माण होते. लिक्विड शरीराच्या टिश्यूज साचू लागतं. झोपताना सरळ झोपल्यामुळे हे लिक्विड डोळ्यांभोवती साचतं, त्यामुळे सकाळी सूज अधिक दिसते. दिवसभर हालचाल केल्यावर गुरुत्वाकर्षणामुळे लिक्विड खाली पायांकडे सरकतं आणि चेहऱ्यावरील सूज कमी होते.

आणखी कोणती लक्षणे दिसू शकतात?

अपुरी झोप

ऍलर्जी

शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन)

जास्त मीठ खाणे

यासोबत इतरही काही लक्षणेही गंभीर असू शकतात. जसे की, फेसाळ लघवी, टाच किंवा पायांमध्ये सूज, सतत थकवा, रक्तदाब वाढणे इत्यादी. त्यामुळे सकाळी झोपेतून उठल्यावर चेहरा सूजलेला दिसत असेल किंवा डोळ्यांखाली सूज नेहमीच दिसत असेल तर वेळ न घालवता वेळीच डॉक्टरांना दाखवा.

Web Title : सुबह चेहरे पर सूजन? किडनी की समस्या का संकेत हो सकता है!

Web Summary : सुबह चेहरे पर सूजन किडनी की समस्या का संकेत हो सकता है। आंखों के आसपास सूजन प्रोटीन रिसाव का संकेत दे सकती है। किडनी की समस्या से द्रव प्रतिधारण हो सकता है, जिससे सूजन हो सकती है। लगातार सूजन को अनदेखा न करें; तुरंत डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Puffy Face in Morning? Could be a Kidney Problem Sign!

Web Summary : Morning facial swelling can signal kidney issues. Swelling, especially around the eyes, might indicate protein leakage. Kidney problems can cause fluid retention, leading to puffiness. Don't ignore persistent swelling; consult a doctor promptly.