Amla juice Benefits : वेगवेगळी फळं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असतात. सोबतच फळांचा ज्यूसही आरोग्यासाठी फायदेशीर असतो. ज्यूसमधून शरीराला अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स मिळतात. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, रोज कोणत्या फळांचा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर ठरतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
वेगवेगळ्या फळांमध्ये आवळा खूप फायदेशीर फळ मानलं जातं. आवळ्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. आवळ्याचा ज्यूसही बरेच लोक पितात. पण त्यांना याचे फायदे माहीत नसतात. तेच आज जाणून घेणार आहोत. सोबतच आवळा ज्यूस कसा तयार करावा हेही जाणून घेऊ.
आवळा ज्यूसची रेसिपी
आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी २ ते ३ आवळे कापून घ्या. त्यातील बिया वेगळ्या काढा. अर्धा ते एक ग्लास पाण्यासोबत त्यांना ब्लेंड करा. जेव्हा हे मिश्रण चांगलं मिक्स होईल, तेव्हा ते गाळून घ्या. यात थोडी काळी मिरी पावडर टाका. थोडं मध टाका.
हाडं मजबूत होतील
आवळ्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात कॅल्शिअमही भरपूर असतं. सायन्स डायरेक्टनुसार, आवळ्याचा ज्यूस ऑस्टियोपोरोसिस आजारावर प्रभावी उपाय आहे. या आजारात हाडे कमजोर होतात आणि हाडे मोडण्याचा धोका असतो.
तरूण दिसाल
वय वाढल्यावर त्वचेमधील कोलेजन कमी होतं. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, ड्रायनेस, डार्क सर्कल आणि त्वचा निर्जीव होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे कोलेजनचं उत्पादन वाढवतं. यामुळे त्वचा तरूण दिसते आणि तुमचं वयही कमी दिसतं.
हृदयासाठी फायदेशीर
आवळ्याचा ज्यूस हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी फार फायदेशीर असतो. काही रिसर्चनुसार, याचं सेवन केल्याने एथेरोजेनिक इंडेक्स कमी होतो. हा इंडेक्स कोलेस्ट्रॉल जमा होण्याच्या शक्यतेबाबत सांगतो. कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने नसा डॅमेज होतात.
इम्यूनिटी वाढते
आवळ्याच्या ज्यूसमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने फ्री रॅडिकल्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-मायक्रोबिअल तत्व वाढतात. ज्यामुळे इम्यून सिस्टीमचा प्रभाव वाढतो. तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.
कुणी पिऊ नये आवळ्याचा ज्यूस?
- किडनीसंबंधी समस्या असलेल्या लोकांनी आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. कारण या फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअम असतं, जे किडनीच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं.
- थायरॉईडच्या रूग्णांसाठी सुद्धा आवळ्याचा ज्यूस सेवन करणं घातक ठरू शकतं. कारण यात आयोडिन असतं, जे थायरॉईडमध्ये चांगलं मानलं जात नाही.
- ज्या लोकांना पोटासंबंधी समस्या आहे, त्यांनीही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. याने पोटात जळजळ आणि अॅसिड रिफ्लक्स होऊ शकतं.
- तसेच गर्भावस्थेतही आवळ्याच्या ज्यूसचं सेवन टाळलं पाहिजे. याने समस्या वाढू शकतात.
- त्याशिवाय तुम्ही सर्जरीआधी किंवा नंतर आवळ्याच्या ज्यूसचं सेवन करू नये. असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. याने ब्लीडिंग जास्त होण्याचा धोका असतो.