Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > त्वचेला बोटाने दाबून पाहा सुज आहे का ? असेल तर असू शकतात 'हे' त्रास, समजून घ्या लक्षणे आणि उपाय

त्वचेला बोटाने दाबून पाहा सुज आहे का ? असेल तर असू शकतात 'हे' त्रास, समजून घ्या लक्षणे आणि उपाय

Press the skin with your finger to see if it is swollen. If so, it could be a problem, understand the symptoms and remedies : अंगाला सारखी सुज येणे चांगले नाही. पाहा काय करायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2025 12:24 IST2025-11-20T12:23:58+5:302025-11-20T12:24:58+5:30

Press the skin with your finger to see if it is swollen. If so, it could be a problem, understand the symptoms and remedies : अंगाला सारखी सुज येणे चांगले नाही. पाहा काय करायला हवे.

Press the skin with your finger to see if it is swollen. If so, it could be a problem, understand the symptoms and remedies. | त्वचेला बोटाने दाबून पाहा सुज आहे का ? असेल तर असू शकतात 'हे' त्रास, समजून घ्या लक्षणे आणि उपाय

त्वचेला बोटाने दाबून पाहा सुज आहे का ? असेल तर असू शकतात 'हे' त्रास, समजून घ्या लक्षणे आणि उपाय

अंगाला सुज येणे ही अनेकांना भेडसावणारी एक सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. काही वेळा ही सुज तात्पुरती असते, तर काहीवेळा शरीरातील अंतर्गत बदल किंवा आजार यांचे संकेतही देते. (Press the skin with your finger to see if it is swollen. If so, it could be a problem, understand the symptoms and remedies.)शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य न राहणे, रक्ताभिसरण मंदावणे किंवा मिठाचे अतिसेवन यामुळेही अंगात द्रव साचू लागतो आणि चेहरा, हात, पाय किंवा टाचा फुगल्यासारखे वाटू लागतात.

थायरॉईडचा त्रास हा सुज येण्यामागील प्रमुख कारणांपैकी एक मानला जातो. थायरॉईड कमी कार्य करु लागला की चयापचय मंदावतो आणि शरीरात द्रव साचतो. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे डायबेटिस. शुगर अनियंत्रित झाल्यास रक्ताभिसरणावर परिणाम होतो आणि किडनीवरही ताण येतो, ज्यामुळे पाणी व्यवस्थित बाहेर न पडता पायांमध्ये किंवा चेहऱ्यावर सुज दिसू लागते. किडनीचे कार्य कमी झाल्यास हेच प्रमाण अधिक वाढते आणि सकाळी डोळ्यांखाली सुज येणे ही सामान्य लक्षणे ठरतात. आहारात जास्त मीठ असणे हे देखील सुज वाढवणारे कारण आहे. मीठ शरीरात पाणी धरून ठेवते, त्यामुळे एकंदर शरीर जड, फुगलेले वाटू शकते.

सुज कमी करण्यासाठी सर्वप्रथम आहारातील मीठ कमी करणे आवश्यक असते. दिवसभर पुरेसे पाणी पिणेही तितकेच गरजेचे आहे, कारण योग्य प्रमाणामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि द्रव संतुलन राखले जाते. पाय सुजत असतील तर झोपताना पायांना उंचावर ठेवणे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. हलके व्यायाम, चालणे किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि पायांची सुज हळूहळू कमी होऊ लागते. कोमट पाण्याची पट्टी किंवा गरजेनुसार थंड कंप्रेशन लावल्यानेही आराम मिळतो.

दिवसभर खूप वेळ बसून किंवा उभे राहण्याची सवय असेल तर ती बदलणे आवश्यक आहे. मधून मधून हालचाल केल्याने पायांमध्ये द्रव साचण्याची शक्यता कमी होते. आहारात पोटॅशियम आणि प्रोटीन्सयुक्त पदार्थ जसे की केळी, नारळपाणी, दही, मूगडाळ, बदाम यांचा समावेश केला तर शरीरातील द्रव संतुलन सुधारते.

सुज सतत राहू लागली किंवा त्यासोबत वेदना, श्वासाचा त्रास किंवा अत्याधिक थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. काहीवेळा ही सुज एखाद्या मोठ्या आजाराची सुरुवातही असू शकते. त्यामुळे कारण समजून घेणे आणि योग्य वेळी वैद्यकीय सल्ला घेणे हे शरीराच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. संपूर्ण काळजी घेतली तर ही सुज सहजपणे कमी करता येते आणि शरीर परत हलके, तंदुरुस्त जाणवू लागते.

Web Title : त्वचा में सूजन? इन लक्षणों, कारणों और उपायों की जाँच करें

Web Summary : सूजन थायरॉयड या मधुमेह जैसी समस्याओं का संकेत दे सकती है। नमक का सेवन कम करें, पानी पिएं, पैर ऊपर उठाएं और व्यायाम करें। लगातार सूजन के लिए चिकित्सीय सलाह लें।

Web Title : Swollen Skin? Check for These Symptoms, Causes, and Remedies

Web Summary : Swelling can indicate underlying issues like thyroid problems or diabetes. Reduce salt intake, drink water, elevate legs, and exercise. Persistent swelling needs medical advice.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.